नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे खासदारांसाठी बांधलेल्या गृहसंकुलाचे अनावरण केले. राष्ट्रीय राजधानीतील डॉ बी डी मार्गावर हे गृहसंकूल आहेत. हे गृहसंकूल बांधण्यासाठी 80 वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या आठ बंगल्यांचा पुनर्विकास करण्यात आला आहे. कोरोना असतानाही या गृहसंकुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून मंजूर खर्चापेक्षा जवळजवळ 14 टक्के बचत झाली आहे. या कार्यक्रमास लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हेदेखील उपस्थित होते. त्यांना मोदींनी आपल्या संबोधनादरम्यान वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
-
The long-pending issues since decades are resolved by looking for a solution and not by procrastinating it. Not only the MPs residences, but there were some other projects also that were pending since years: PM Narendra Modi https://t.co/RERsMWfACh pic.twitter.com/z9pXz1Dq8s
— ANI (@ANI) November 23, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The long-pending issues since decades are resolved by looking for a solution and not by procrastinating it. Not only the MPs residences, but there were some other projects also that were pending since years: PM Narendra Modi https://t.co/RERsMWfACh pic.twitter.com/z9pXz1Dq8s
— ANI (@ANI) November 23, 2020The long-pending issues since decades are resolved by looking for a solution and not by procrastinating it. Not only the MPs residences, but there were some other projects also that were pending since years: PM Narendra Modi https://t.co/RERsMWfACh pic.twitter.com/z9pXz1Dq8s
— ANI (@ANI) November 23, 2020
भाजपा सरकारच्या काळात बर्याच इमारतींचे बांधकाम सुरू झाले आणि ते नियोजित वेळेपूर्वीच संपले. अटलजी यांच्या काळात आंबेडकर राष्ट्रीय स्मारक उभारण्याविषयी चर्चा झाली होती. तेही याच सरकारमध्ये उभारण्यात आले. आमच्या सरकारमध्ये केंद्रीय माहिती आयोगाची नवीन इमारत बांधली गेली. आपल्या देशात हजारो पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपले प्राण दिले आहेत. त्याचेही राष्ट्रीय पोलीस स्मारक बांधण्यात आले, असे मोदी म्हणाले. तथापि, आज मोदींनी अनावरण केलेल्या या गृहसंकुलात 76 फ्लॅट आहेत.
जम्मू काश्मीरचा विकास -
जम्मू काश्मीरमधील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम केले. तसेच कायदेही केले. पहिल्यांदा जम्मू काश्मीरमध्ये भ्रष्टाचार रोखण्यासाठी कायदे करण्यात आले. आज आपल्याकडे साधनेही आहेत आणि दृढ संकल्प आहे, असेही ते म्हणाले. दशकांपासून सुरू असलेल्या समस्या टाळल्यामुळे नाही तर, त्यावर उपाय शोधल्याने त्या संपतात. फक्त खासदारांचे नाही तर दिल्लीमधील अनेक प्रकल्प तसेच पडून होते, असेही मोदी म्हणाले.