कोची - दुसऱ्यांदा सरकार स्थापन केल्यानंतर पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी पहिल्यांदाच केरळ येथे पोहोचले. गुरुवायूर येथे जनतेशी संवाद साधल्यानंतर आणि पूजा केल्यानंतर मोदी मालदीव दौऱ्यावर रवाना झाले आहेत.
मोदी केरळ येथे पोहोचल्यानंतर त्यांची ११२ किलो कमळांच्या फुलांनी तुला करण्यात आली. यानंतर मोदींनी गुरुवायूर येथील श्रीकृष्ण मंदिरात पूजा केली. मोदींनी भाजप कार्यकर्त्यांशी संवादही साधला. यानंतर, कोची येथून मोदी मालदीव दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. मालदीव दौऱ्यानंतर नरेंद्र मोदी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहेत.