ETV Bharat / bharat

गुजरात दौरा : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आरोग्य वनाचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. अनेक प्रकल्पांचे त्यांनी आज उद्घाटन केले. तर उद्या पंतप्रधान सी-प्लेनचे उद्घाटन करणार आहेत. तसेच या दौऱ्यात ते मातोश्री हीरा बा यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

मोदी
मोदी
author img

By

Published : Oct 30, 2020, 4:59 PM IST

केवडीया - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील केवडियामध्ये आरोग्य वन, एकता मॉल आणि चिल्ड्रन न्युट्रीशियन पार्कचे उद्घाटन केले. तसेच अन्य काही प्रकल्पांच्या कामाचे भूमीपूजनही त्यांनी केले. यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री विजय रुपानी उपस्थित होते. आरोग्य वनात जवळपास 15 एकर परिसरात औषधीयुक्त वनस्पतींचे रोपण करण्यात आले आहे. यात 380 प्रजातींची 5 लाख रोपं आहेत. योग आणि आयुर्वेद लक्षात घेता, याचे निर्माण करण्यात आले आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते चिल्ड्रन न्युट्रीशियन पार्कचे उद्नघाटन

एकता मॉलमध्ये हस्तकला आणि पारंपरिक उत्पादनांचे प्रदर्शन भरवण्यात आले. हा माॉल 35 हजार चौरस फुटात पसरलेला असून 110 दिवसांत तयार करण्यात आला आहे. मार्चमध्ये कोरोनाचा प्रसार वाढल्यानंतर मोदी यांचा आजचा हा पहिलाच गुजरात दौरा आहे. तथापी, गुजरातमध्ये पोहचल्यानंतर मोदींनी माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली. केशुभाई पटेल (92) यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले होते. ते बऱ्याच दिवसापासून आजारी होते. तसेच त्यांनी गुजराती सिनेसृष्टीचे सुपरस्टार नरेश कनोडिया आणि त्यांचे संगीतकार भाऊ भाई महेश कनोडिया यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कनोडिया बंधूंना श्रद्धांजली वाहिली.

पंतप्रधान मोदी यांनी कनोडिया बंधूंना श्रद्धांजली वाहिली

उद्या सी-प्लेनचे उद्घाटन -

पंतप्रधान दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते मातोश्री हीरा बा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. उद्या नरेंद्र मोदी हे सी-प्लेनचे उद्घाटन करणार आहेत. सी-प्लेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.