जबलपूर- राजस्थानातील जबलपूर येथे राहणाऱ्या सोमन जैन या चित्रकार युवकाने घराच्या भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र रेखाटले आहे. लोक यामुळे युवकाचे कौतुक करत आहेत. सोमन जैनने काढलेले चित्र पाहून केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल पाहिले. त्यांनी सोमन जैनचे कोतुक करत त्याने रेखाटलेला फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.
देशातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 24 मार्चपासून सुरु असलेले लॉकाडाऊन 17 मे पर्यंत वाढवण्यात आले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी डॉक्टर, परिचारिका, पोलीस, स्वच्छता कर्मचारी, पत्रकार आपापल्या परीने लढत आहेत.
कोरोनाशी लढणाऱ्यांना कोरोना वॉरिअर्स म्हटले जात आहे. लॉकडाऊनच्या काळात नागरिक आपापल्या परिने कोरोना वॉरिअर्सचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये नागरिक त्यांच्याकडील कलेचा वापर करताना दिसत आहेत. याचाच एक भाग म्हणून सोमन जैनने पंतप्रधानांचे चित्र घराच्या भिंतीवर रेखाटल्याने त्याचे कौतुक होत आहे.