ETV Bharat / bharat

आत्मनिर्भर भारत: कोळसा खाणींच्या व्यावसायिकीकरणासाठी 10 जूनला लिलाव होणार - COAL AUCTION

भारताने नुकतेच आत्मनिर्भर भारत अभियान सुरू केले आहे. कोळसा उत्पादनात भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी कोळसा खाण उद्योगात संरचनात्मक बदल करण्यात येत आहेत, असे कोळसा मंत्री म्हणाले.

पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी
author img

By

Published : Jun 11, 2020, 8:42 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जूनपासून कोळश्याच्या खाणींचा व्यावसायिक उत्पादनासाठी लिलाव करणार आहेत. आत्मनिर्भर भारत मिशन अंतर्गत खाण उद्योगाचे व्यावसायिकीकरण करण्यासाठी सरकार लिलाव करणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लिलावाचे उद्धाटन मोदी करणार आहेत. अंदाजे 50 कोळसा ब्लॉक लिलावात देण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

'अनलिशिंग कोल: न्यू होप फॉर आत्मनिर्भर भारत' अशी संकल्पना या लिलाव कार्यक्रमाची ठेवण्यात आली आहे. आम्ही पहिल्यांदाच व्यावसायिक खाण लिलाव 18 जूनला आयोजित करत आहोत. भारताला कोळसा उत्पादनात आत्मनिर्भर करण्यासाठी मोदींची दुरुदृष्टी आणि मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे. आपण सर्वजण हे ध्येय गाठण्यासाठी एकाच मार्गावर आहोत, असे ट्विट कोळसामंत्री प्रल्हाद जोशी यांनी केले आहे.

भारताने नुकतेच आत्मनिर्भर भारत अभियान सुरू केले आहे. कोळसा उत्पादनात भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी कोळसा खाण उद्योगात संरचनात्मक बदल करण्यात येत आहेत. आधीच्या लिलावापासून हा लिलाव वेगळा असल्याचे जोशी म्हणाले. उद्योगांसाठी सुलभ अटी आणि नियम या लिलावात आहेत.

याशिवाय, ऑटोमॅटिक मार्गाने 100 टक्के परदेशी गुंतवणूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सुलभ आर्थिक नियमावली आणि महसुल वाटपाचे योग्य नियम असणार आहेत. लिलाव जिंकणाऱ्यांना लवचिक धोरण लागू करण्यात असल्याचे कोळसा मंत्र्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.