भोपाळ - मध्यप्रदेमधील भोपाळ जिल्ह्यातल्या एका खेडेगावाच देशभरामध्ये नाव झालं आहे. गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं पंतप्रधानांनी पत्र लिहून कौतुक केलं आहे. झिकरिया खुर्द या ग्रामंपचायतीला हागणदारी मुक्त केल्यामुळे ही शाबासकी मिळाली आहे. गावचे सरपंच अमान उल्ला यांना मोदींनी अभिनंदनाचे पत्र लिहले आहे.
झिकरिया खुर्द हे गाव भोपाळ जिल्ह्यातील बरासिया तहसिल विभागामध्ये येते. भोपाळपासून हे गाव ६५ कि.मी दूर आहे. मोदींनी कौतुक केल्यामुळे काम करण्याची आणखी प्रेरणा मिळाली, असे अमान उल्ला यांनी सांगितले. अमान उल्ला यांनी स्वच्छ भारत मोहीमेमध्ये दिलेल्या योगदानाचे मोदींनी कौतूक केलं. तसेच प्लास्टिक मुक्त भारत करण्यासाठी प्रेरणा दिली.
२ ऑक्टोबर म्हणजेच 'स्वच्छताही सेवा' मोहिमेचे आयोजन केले जाणार आहे, त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन मोदींनी पत्राद्वारे केले. स्वच्छ भारत अभियान राबवून देशाला प्रदूषण मुक्त भारत करण्याचा संकल्प मोदींना व्यक्त केला. गाव आणि देश स्वच्छ करण्याचे काम असेच करत रहा, असे मोदी म्हणाले