ETV Bharat / bharat

'सीएए व एनआरसीवरुन शहरी नक्षलवादी पसरवत आहेत अफवा'

रामलीला मैदानावर पंतप्रधान मोदींनी धन्यवाद रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीवरून काँग्रेस आणि विरोधकांवर निशाना साधला.

पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी
author img

By

Published : Dec 22, 2019, 1:21 PM IST

Updated : Dec 22, 2019, 6:00 PM IST

नवी दिल्ली - रामलीला मैदानावर पंतप्रधान मोदींनी धन्यवाद रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीवरून काँग्रेस आणि विरोधकांवर निशाना साधला. काँग्रेस आणि विरोधी पक्ष अफवा पसरवत असल्याची टीका त्यांनी केली. मोदी मुस्लिमांसाठी देशभरात तुरुंग(डिटेंशन सेंटर) उघडणार असल्याची अफवा विरोधक पसरवत असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.

रामलीला मैदानावरील मोदींचे भाषण

हेही वाचा - शिमला फिरायला गेलेल्या युवकांची गाडी दरीत कोसळली, ५ जणांचा जागीच मृत्यू

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवरही निशाना साधला. आज ममता बॅनर्जी कोलकात्यावरून थेट संयुक्त राष्ट्रामध्ये पोहचल्या. काही वर्षांपूर्वी त्या बांग्लादेशातून येणाऱ्या घुसखोरांना थांबवण्यात यावे, तेथून येणाऱ्या शणार्थींना मदत करावी, अशी मागणी त्या करत होत्या. मात्र, आता त्या का बदलल्या असा सवाल त्यांनी केला.

घुसखोर ओळख सांगत नाही, तर शरणार्थी ओळख लपवत नाही. काँग्रेस आणि शहरी नक्षलवाद्यांनी मोदी देशभर मुस्लिमांसाठी डिटेंशन सेंटर उघडणार अशी अफवा पसरवली आहे, मात्र, ही अफवा खोटी आहे. जे भारतातील मुसलमान आहेत, त्यांचा आणि या कायद्यांचा काहीही संबध नाही, असे मोदी म्हणाले.

हेही वाचा - १०० वर्ष जुन्या पक्षाचे नेते देशातील हिंसेवर मौन बाळगून आहेत, मोदींचा काँग्रेसला टोला

मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे

  • PM: Some political parties are spreading rumours, they're misleading people & inciting them. I want to ask them, when we authroised the unauthrosied colonies, did we ask anyone their religion? Did we ask which political party they support? Did we ask for documents from 1970,1980? pic.twitter.com/UATYXnzjxS

    — ANI (@ANI) December 22, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • जे देशातील मुस्लीम आहेत, त्यांचा एनआरसी आणि नागरिकत्व कायद्याशी काहीही संबंध नाही
  • सगळ्या अफवा खोट्या आहेत
  • एनआरसी, नागरिकत्व सुधारीत कायदा वाचा, मोदींचे तरुणांना आवाहन
  • शिकलेले शहरी नक्षलवादी मुस्लिमांना तुरुंगात डांबण्यात येईल, अशी अफवा पसरवत आहेत
    कोठेही एनआरसीवर आत्तापर्यंत चर्चा झाली नाही, काँग्रेस आणि विरोधक लोकांमध्ये खोटी माहिती पसरवत आहेत.
  • एनआरसी काँग्रेसच्या काळातील योजना
  • नागरिकत्व दुरुस्ती कायदा देशातील नागरिकांसाठी नाही, त्यांचा या कायद्याशी काहीही संबध नाही
  • कागदपत्रांच्या नावावर मुस्लिमांची दिशाभूल केली जातेय
  • दिल्लीकरांची घराची चिंता मिटली
  • दिल्लीतील अनधिकृत घरे नियमित केली
  • विविधतेत एकता हीच भारताची ताकद
  • दिल्लीतील ४० लाख लोकांसाठी
  • पोलिसांवर का हल्ले केले जात आहेत
  • दिल्लीत दोन हजारांपेक्षा जास्त बंगले खाली केले आहेत
  • १०० वर्ष जुन्या पक्षाचे नेते देशातील हिंसेवर मौन बाळगून आहेत, मोदींचा काँग्रेसला टोला
  • भीती पसरवून विरोधकांचे मताचे राजकारण
  • हिसांचार थांबण्यासाठी काँग्रेस काहीच का बोलत नाहीत- मोदींचा काँग्रेसवर टोला

हेही वाचा - आयुष्मान भारत : पुढचा मार्ग खडतर

दिल्लीमधील १ हजार ७३१ अनधिकृत कॉलनी भाजप सरकारने अधिकृत केल्या. त्यामुळे पंतप्रधान मोदींना धन्यवाद देण्यासाठी रामलीला मैदानावर एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रामलीला मैदानापासून एक किमी अंतरावर शुक्रवारी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात हिंसक आंदोलन झाले होते. त्यामुळे मैदानावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत. दिल्लीमधील अनधिकृत कॉलन्यांना अधिकृत केल्यामुळे ४० लाख लोकांना मालकी हक्क मिळणार आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये हिंसक आंदोलन सूरू आहे. त्यामुळे रामलीला मैदानावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय रामलीला मैदानावर लोटला होता.

Intro:Body:

रामलीला मैदानावर मोदींची धन्यवाद रॅली सुरू, दिल्ली निवडणुकींच्या प्रचाराचाही नारळ फोडणार  

दिल्ली - रामलीला मैदानावर पंतप्रधान मोदींच्या धन्यावाद रॅलीला सुरूवात झाली आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये हिंसक आंदोलन सूरू आहे. त्यामुळे रामलीला मैदानावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. थोड्य़ाच वेळात मोदी रॅलीला संबोधित करणार आहेत. मोठ्या प्रमाणात जनसमुदाय रामलीला मैदानावर लोटला आहे.

दिल्लीमधील १ हजार ७३१ अनधिकृत कॉलीनी भाजप सरकारने अधिकृत केल्या. त्यामुळे पंतप्रधान मोदींना धन्यवाद देण्यासाठी रामलिला मैदानावर एका रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रामलीला मैदानापासून एक किमी अंतरावर शुक्रवारी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात हिंसक आंदोलन झाले होते. त्यामुळे मैदानावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे.

यावेळी पंतप्रधान मोदी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात करणार आहेत. दिल्लीमधील अनधिकृत कॉलीन्यांना अधिकृत केल्यामुळे ४० लाख लोकांना मालकी हक्क मिळणार आहे.

Conclusion:
Last Updated : Dec 22, 2019, 6:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.