बंगळुरू - देशाच्या संरक्षण क्षेत्रामध्ये स्वदेशी संशोधन क्षमता वाढावी, या उद्देशाने सरकार पाऊले उचलत आहे. याचाच एक भाग म्हणून, गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच नव्या डीआरडीओ प्रयोगशाळांचे अनावरण केले.
-
Karnataka: Prime Minister Narendra Modi launches Five Defence Research and Development Organisation (DRDO) Young Scientists Laboratories in Bengaluru. pic.twitter.com/ann7W6xBy2
— ANI (@ANI) 2 January 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Karnataka: Prime Minister Narendra Modi launches Five Defence Research and Development Organisation (DRDO) Young Scientists Laboratories in Bengaluru. pic.twitter.com/ann7W6xBy2
— ANI (@ANI) 2 January 2020Karnataka: Prime Minister Narendra Modi launches Five Defence Research and Development Organisation (DRDO) Young Scientists Laboratories in Bengaluru. pic.twitter.com/ann7W6xBy2
— ANI (@ANI) 2 January 2020
पंतप्रधान मोदी सध्या दोन दिवसीय कर्नाटक दौऱ्यावर आहेत. बंगळुरूमध्ये त्यांनी वैमानिकी विकास आस्थापनेच्या एका कार्यक्रमामध्ये या प्रयोगशाळांचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधानांनी डीआरडीओच्या काही नवीन संशोधनांचीही पाहणी केली. त्यांच्या सोबत कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा आणि डीआरडीओचे चेअरमन जी. सतीश रेड्डी हेदेखील उपस्थित होते.
२०१४ मध्येच त्यांनी ३५ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या, तरुण वैज्ञानिकांसाठी कमीत कमी पाच तरी प्रयोगशाळा असाव्यात अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यावर काम करत, डीआरडीओने या प्रयोगशाळा उभारल्या आहेत. या कामाचे पंतप्रधानांनी आज कौतुकही केले.
हेही वाचा : पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले 'प्रधानमंत्री किसान' योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचे अनावरण..