चंदीगड - 'जेव्हा आम्ही स्वच्छ भारत मिशन आणि सर्जिकल स्ट्राईकबद्दल बोलतो तेव्हा विरोधकांच्या पोटात दुखतं आणि जर एखाद्यानं बालाकोटचं नाव काढलं की विरोधक वेदनेनं थयथयाट करतात', अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि विरोधकांवर हरियातील सोनिपत येथे विधानसभा प्रचार सभेदरम्यान केली.
-
PM Narendra Modi in Sonipat,Haryana: When we talk of Swacch Bharat or surgical strike then Congress gets stomach ache,and if by chance anyone says Balakot then Congress starts jumping with pain. Pakistan uses them to strengthen their case globally,what sort of chemistry is this? pic.twitter.com/H2pkxhs2lB
— ANI (@ANI) October 18, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">PM Narendra Modi in Sonipat,Haryana: When we talk of Swacch Bharat or surgical strike then Congress gets stomach ache,and if by chance anyone says Balakot then Congress starts jumping with pain. Pakistan uses them to strengthen their case globally,what sort of chemistry is this? pic.twitter.com/H2pkxhs2lB
— ANI (@ANI) October 18, 2019PM Narendra Modi in Sonipat,Haryana: When we talk of Swacch Bharat or surgical strike then Congress gets stomach ache,and if by chance anyone says Balakot then Congress starts jumping with pain. Pakistan uses them to strengthen their case globally,what sort of chemistry is this? pic.twitter.com/H2pkxhs2lB
— ANI (@ANI) October 18, 2019
हेही वाचा - न्यायमूर्ती बोबडे होणार उत्तराधिकारी, सरन्यायाधीश गोगोईंकडून शिफारस
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीर मुद्दा मांडण्यासाठी विरोधकांच्या वक्तव्यांचा वापर करत आहे. हा काय प्रकार आहे? काँग्रेसच्या राज्यामध्ये जवान, शेतकरी आणि खेळाडू कोणीच सुरक्षित नाही. शेती आणि क्रीडा क्षेत्रामध्ये घोटाळे केल्याचा आरोप मोदींनी काँग्रेसवर केला.
हरियाणाने प्रत्येक क्षेत्रामध्ये देशाला अभिमान वाटेल, असे काम केले आहे. कुस्तीचे क्षेत्र असो किंवा दशतवाद विरोधातील लढाई असो हरियाणाच्या नागरिकांनी चांगले काम केले आहे. सोनिपत म्हणजे किसान, जवान आणि पेहलवान असा नारा मोदींनी दिला.
हेही वाचा - अयोध्या विवाद : जाणून घ्या, काय आहे पार्श्वभूमी आणि घटनाक्रम
हरियाणा विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराच्या रिंगणात उतरले आहे. याआधी झालेल्या सभेमध्ये त्यांनी पाकिस्तानला जाणारे पाणी हरियाणातील शेतकऱयांच्या दारात आणण्याचे आश्वासन दिले. हरियाणा विधानसभेचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असून राहुल गांधीही आज हरियाणामध्ये सभा घेत आहेत.