नवी दिल्ली - गडचिरोली येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे. गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी शीघ्र कृती दलाच्या जवानांच्या दोन वाहनांवर हल्ला केला. या हल्ल्यात १५ जवान तर एका वाहन चालकाला वीरमरण आले.
या भ्याड हल्ल्यामध्ये वीरमरण आलेल्या जवानांना शब्दातून आदरांजली वाहताना, त्यांचे हौतात्म्य कधीही विसरले जाणे शक्य नसल्याचे मोदी म्हणाले. वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबियांसोबत आपण नेहमीच असू. ज्यांनी हा हल्ला केला त्यांची गय केली जाणार नसल्याचेही मोदी म्हणाले.