ETV Bharat / bharat

सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी बैठक - नवी दिल्ली

भारताने मंगळवारी केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून आज भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. भारताकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले. सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी एक उच्चस्तरीय बैठक पार पडली.

नवी दिल्ली
author img

By

Published : Feb 27, 2019, 6:47 PM IST

नवी दिल्ली - भारताने मंगळवारी केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून आज भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. भारताकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले. सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी एक उच्चस्तरीय बैठक पार पडली.

पंतप्रधानांच्या निवासस्थानी राष्ट्रीय सुरक्षा प्रमुख आणि गुप्तचर सुरक्षा यंत्रणांच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याकडून पंतप्रधान मोदींनी चालू घटनांची माहिती घेतली. जवळपास अर्धा तास सुरू असलेल्या या बैठकीत पंतप्रधानांनी सुरक्षेसंबंधीच्या तयारी तिन्ही सुरक्षा प्रमुखांकडून माहिती घेतली.

भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सकाळी गृहमंत्रालयानेही बैठक बोलावली होती. त्यापूर्वी चीनमध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी भारताने केलेल्या कारवाईचे समर्थन करताना दहशतवादाला सहन न करण्याचे इतर देशांना आवाहन केले. भारत, चीन आणि रशिया या तीन देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या.

Intro:Body:

pm Modi chairs a high level security meeting

सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी बैठक

नवी दिल्ली - भारताने मंगळवारी केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून आज भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. भारताकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले. सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. 

पंतप्रधानांच्या निवासस्थानी राष्ट्रीय सुरक्षा प्रमुख आणि गुप्तचर सुरक्षा यंत्रणांच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याकडून पंतप्रधान मोदींनी चालू घटनांची माहिती घेतली. जवळपास अर्धा तास सुरू असलेल्या या बैठकीत पंतप्रधानांनी सुरक्षेसंबंधीच्या तयारी तिन्ही सुरक्षा प्रमुखांकडून माहिती घेतली.  

भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सकाळी गृहमंत्रालयानेही बैठक बोलावली होती. त्यापूर्वी चीनमध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी भारताने केलेल्या कारवाईचे समर्थन करताना दहशतवादाला सहन न करण्याचे इतर देशांना आवाहन केले. भारत, चीन आणि रशिया या तीन देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.