कोरोनामुळे आपल्या ध्येयामध्ये काहीही व्हायला नको. त्यामुळे देशातील चौथा लॉकडाऊन हा नव्या नियमांसह लागू होईल. यामध्ये काही प्रमाणात शिथिलताही असेल. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांनुसार या लॉकडाऊनमधील निर्बंध ठरवण्यात येतील. तसेच याबाबत अधिक माहिती मी १८ मेपूर्वी तुम्हाला देईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केले आहे.
'लॉकडाऊन-४' अन् २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा; पहा काय म्हणाले पंतप्रधान मोदी..
20:30 May 12
नव्या नियमांसोबत लागू होणार 'लॉकडाऊन ४'..
20:18 May 12
२०२०साठी २० लाख कोटी : 'स्वयंपूर्ण भारत अभियाना'साठी आर्थिक पॅकेजची घोषणा..
- आतापर्यंत अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेले पॅकेज, आणि आज जाहीर झालेले पॅकेज याची एकूण किंमत वीस लाख कोटी..
- ही रक्कम देशाच्या जीडीपीच्या दहा टक्के..
- देशातील प्रत्येक नागरिकासाठी या पॅकेजमध्ये तरतूद..
- याबाबत अधिक माहिती लवकरच जाहीर करणार..
20:14 May 12
स्वयंपूर्ण भारताचे पाच खांब..
- अर्थव्यवस्था
- इन्फ्रास्ट्रक्चर
- व्यवस्था
- भौगोलिक स्थिती
- मागणी
20:09 May 12
देश स्वयंपूर्ण, मात्र स्वार्थी नाही..
'वसुधैव कुटुंबकम्' ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे आपण स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करतानाच संपूर्ण जगालाही सोबत घेऊन पुढे जातो. देशामध्ये झालेल्या बदलांचा, देशामध्ये राबवलेल्या मोहिमांचा परिणाम संपूर्ण जगावर होतो आहे. टीबी, पोलिओ अशा आजारांविरोधात देशात राबवलेल्या मोहीमा जगाला मार्ग दाखवतात. तसेच आज आपल्या देशात बनलेली औषधे अमेरिकेपासून सर्व देश आयात करत आहेत. मात्र आपला देश हे सर्व कसे करतो आहे? त्याला कारण आहे देशातील १३० कोटी नागरिकांचा स्वयंपूर्ण होण्याचा संकल्प!
20:06 May 12
'२१वे शतक भारताचे' असावे हे आपले स्वप्नच नाही तर जबाबदारीही..
एक राष्ट्र म्हणून आपण एका मोठ्या संकटासमोर उभे आहोत. मात्र हे संकट आपल्यासाठी एक मोठी संधीही घेऊन आले आहे. देशात कोरोनाचा शिरकाव झाला तेव्हा आपल्याकडे एकही पीपीई किट नव्हते; मात्र आता आपण दिवसाला दोन लाख पीपीई किट बनवत आहोत, तसेच एक लाख एन-९५ मास्क बनवत आहोत.
20:02 May 12
"हमें बचना भी है, और बढना भी है!"...
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आतापर्यंत कोरोनामुळे बळी गेलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहत आपल्या संदेशाची सुरूवात केली. अशा प्रकारची आपत्ती आपण ना कधी पाहिले आहे, ना कधी ऐकले आहे. मानवजातीसाठी हे सर्व एक दुःस्वप्न आहे. मात्र, आपण हरायचे नाहीये. अशा प्रकारच्या लढाईसाठी लागू होणाऱ्या सर्व नियमांचे पालन करत आपल्याला आपले रक्षणही करायचे आहे, आणि आपली प्रगतीदेखील करायची आहे...
19:17 May 12
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नागरिकांना संदेश..
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील लोकांना संबोधित करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये लागू असेलला तिसरा लॉकडाऊन १७ मेला संपणार आहे. काल (सोमवार) पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यानंतर आज पंतप्रधान देशाला संबोधित करत आहेत. यामध्ये ते चौथ्या लॉकडाऊनबाबत घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.