ETV Bharat / bharat

नो टू सिंगल यूज प्लास्टिक : प्लास्टिकच्या बाटल्यांपासून उभारणार अंगणवाडी केंद्रांच्या इमारती - आसाम अंगणवाडी प्रकल्प

'किशालया' या प्रकल्पाअंतर्गत, जिल्ह्यातील १०० अंगणवाडी केंद्राच्या इमारती या प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करून उभारण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये ४५ अंगणवाडी केंद्रांचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे.

नो टू सिंगल यूज प्लास्टिक
नो टू सिंगल यूज प्लास्टिक
author img

By

Published : Jan 28, 2020, 6:00 PM IST

Updated : Jan 28, 2020, 8:02 PM IST

दिसपूर - प्लास्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि पुनर्वापर करण्याच्या नवनवीन संकल्पनांचा शोध सातत्याने सुरू आहे. यासाठी आसामच्या माजूली जिल्ह्यातील एक अंगणवाडी, सर्वांनाच रस्ता दाखवणारी आहे. माजुली जिल्ह्याचे उपायुक्त विक्रम कैरी यांनी सुरू केलेल्या 'किशालया' या प्रकल्पाअंतर्गत, जिल्ह्यातील १०० अंगणवाडी केंद्राच्या इमारती या प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करून उभारण्यात येणार आहेत.

हेही वाचा - शिक्षकाने गाण्यातून दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

अशा प्रकारे तयार केली जाणाऱ्या पहिल्या अंगणवाडीचा एकूण खर्च सुमारे ८० हजार रूपये असणार आहे. सिलाकला गाव पंचायतीमध्ये येणाऱ्या काकोरीकोटा पाबना गावामध्ये ही अंगणवाडी बांधण्यात येणार आहे. जगातील सर्वात मोठे नदीमधील बेट असलेल्या या ठिकाणातील अंगणवाडीसाठीचा कोनाशीला समारंभ २५ डिसेंबर २०१९ला पार पडला होता. किशालया प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये ४५ अंगणवाडी केंद्रांचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये ब्रह्मपुत्रेच्या बेटावरील स्थानिकही मोलाचे योगदान करत आहेत.

हेही वाचा - नो टू सिंगल यूज प्लास्टिक : अन्य राज्यांसाठी मॉडेल बनत आहे अंबिकापूर 'कचरा व्यवस्थापन'

या प्रकल्पाची व्याप्ती पाहता, एवढ्या प्रमाणात अंगणवाडी केंद्रे बनवण्यासाठी लाखो प्लास्टिक बाटल्यांची गरज पडणार आहे. आणि हा 'कच्चा माल' गोळा करण्याचे काम काकोरिकोटामधील 'इंदिरा वुमन सोसायटी' आणि गावातील काही स्वयंसेवी संस्थांना दिले आहे. या संस्थांना या कामासाठी आर्थिक मदतही देण्यात येणार आहे.

हेही वाचा - नो टू सिंगल यूज प्लास्टिक: घरोघरी जाऊन प्लास्टिक कचरा जमा करतोय इलेक्ट्र्रिकल इंजीनिअर

Intro:Body:

नो टू सिंगल यूज प्लास्टिक : प्लास्टिकच्या बाटल्यांपासून उभारणार अंगणवाडी केंद्रांच्या इमारती

दिसपूर - प्लास्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि पुनर्वापर करण्याच्या नवनवीन संकल्पनांचा शोध सातत्याने सुरू आहे. यासाठी आसामच्या माजुली जिल्ह्यातील एक अंगणवाडी, सर्वांना मार्गदर्शन करत आहे. माजुली जिल्ह्याचे उपायुक्त विक्रम कैरी यांनी सुरू केलेल्या 'किशालया' या प्रकल्पाअंतर्गत, जिल्ह्यातील १०० अंगणवाडी केंद्राच्या इमारती या प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करून उभारण्यात येणार आहेत.

अशा प्रकारे तयार केली जाणाऱ्या पहिल्या अंगणवाडीचा एकूण खर्च सुमारे ८० हजार रूपये असणार आहे. सिलाकला गाव पंचायतीमध्ये येणाऱ्या काकोरीकोटा पाबना गावामध्ये ही अंगणवाडी बांधण्यात येणार आहे. जगातील सर्वात मोठे नदीमधील बेट असलेल्या या ठिकाणातील अंगणवाडीसाठीचा कोनाशीला समारंभ २५ डिसेंबर २०१९ला पार पडला होता. किशालया प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये ४५ अंगणवाडी केंद्रांचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये ब्रह्मपुत्रेच्या बेटावरील स्थानिकही मोलाचे योगदान करत आहेत.

या प्रकल्पाची व्याप्ती पाहता, एवढ्या प्रमाणात अंगणवाडी केंद्रे बनवण्यासाठी लाखो प्लास्टिक बाटल्यांची गरज पडणार आहे. आणि हा 'कच्चा माल' गोळा करण्याचे काम काकोरिकोटामधील 'इंदिरा वुमन सोसायटी' आणि गावातील काही स्वयंसेवी संस्थांना दिले आहे. या संस्थांना या कामासाठी आर्थिक मदतही देण्यात येणार आहे.

Conclusion:
Last Updated : Jan 28, 2020, 8:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.