ETV Bharat / bharat

सचिन पायलट भाजपमध्ये जाणार नाहीत, मात्र सिंधिंयाच्या संपर्कात - Congress

राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आज भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, आज होणाऱ्या आमदारांच्या बैठकीसाठी ते जयपूरला जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Pilot will not join BJP
सचिन पायलट भाजपमध्ये जाणार नाहीत
author img

By

Published : Jul 13, 2020, 12:57 PM IST

Updated : Jul 13, 2020, 1:20 PM IST

नवी दिल्ली - राजस्थानमध्ये सुरू झालेल्या सत्ता संघर्षात आता नवीन वळण प्राप्त झाले आहे. राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आता मी भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. आमदार खरेदी प्रकरणी राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन दलाच्या नोटीसनंतर गेहलोत आणि पायलट यांच्यातील वाद अधिकच ताणला गेला होता. त्यानंतर पायलट यांनी दिल्लीत ठाण मांडले आहे. त्यानंतर ते भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे म्हटले आहे, असे असले तरी ते भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिंया यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दिल्लीमध्ये पूर्वीचे काँग्रेस नेते आणि त्यांचे सहकारी ज्योतिरादित्य सिंधिया आणि पायलट यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली. मात्र, त्या दोघांमध्ये काय चर्चा झाली याबाबतची माहिती समोर आली नाही. दोन्ही नेत्यांनी यापूर्वी काँग्रेसमध्ये अनेकवर्ष एकत्र काम केलेले आहे. तसेच त्या दोघांचा आजही नियमित फोनवरून संपर्क सुरू असतो. त्यानंतर रविवारी सिंधिंया यांनी पायलट यांचे समर्थन करत काँग्रेसमध्ये त्यांची कुंचबना होत असल्याचे ट्विट केले होते.

पायलट सध्या गेहलोत यांच्यावर नाराज आहेत. पायलट आणि त्याच्या समर्थकांना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडून वारंवार अपमानित व्हावे लागले, तसेच पायलट यांच्या अनेक समर्थकांच्या मागे सीआयडीचा ससेमीरा लावला, आणि त्यांचा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयास दिला जात होता, असा आरोप पायलट यांच्या समर्थकांनी केला आहे.

पायलट यांनी रविवार रात्री उशीरा आज होणाऱ्या काँग्रेस आमदारांच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच राज्यातील गेहलोत सरकार अल्पमतात असल्याचा दावा ही त्यांनी केला. सचिन पायलट नियमीत वापरत असलेल्या एका व्हॉट्सअ‌ॅप ग्रुपवर त्यांना ३० आमदारांचा पाठिंबा असल्याचा मेसेज आहे. त्यात म्हटले आहे की, असे असेल तर अशोक गहलोत सरकार अल्पमतात आहे. त्यांना विधीमंडळ पक्षाची बैठक घेण्याचा अधिकार नाही. पायलट यांच्याकडून हा मेसेज असेल आणि तो अधिकृत मानला गेला तर त्यांनी एकप्रकारे मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला आहे.

चर्चेसाठी काँग्रेसची दारे खुली-

आज राजस्थान काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये सचिन पायलट यांच्यासह कोणत्याही आमदारांना पक्षाबद्दल काही नाराजी असेल तर त्यांनी पक्ष प्रमुखांशी चर्चा करावी, आमदारांनी बैठकीला उपस्थित राहावे, दुपारी २ वाजेपर्यंत त्यांनी बैठकीला आले तरी चालेल. तसेच पायलट यांच्यासोबत अनेकवेळा फोनवरून चर्चा झाली असल्याचेही सुरजेवाला यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी सुरजेवाला यांनी सचिन पायलट यांना चर्चेसाठी दारे खुली आहेत त्यांनी चर्चा करावी, असे आवाहन केले.

Last Updated : Jul 13, 2020, 1:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.