ETV Bharat / bharat

'फार्मा उद्योगातील चिनी आयातीमुळे भारताची सुरक्षा धोक्यात'

एपीआय आणि अनेक ऑरगॅनिक (सेंद्रिय) रसायने भारत चीनकडून मागवतो. चीनकडून भारताला होणारी एकूण फार्मास्युटिकल क्षेत्रातील आयात 1 हजार कोटी डॉलरच्या घरात आहे. फार्मा उद्योगातील सुमारे 70 टक्के आयात भारताला चीनकडून होते. यावर मद्रास उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे.

FILE PIC
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Oct 9, 2020, 4:36 PM IST

चेन्नई - औषध (फार्मा) उद्योगातील महत्त्वाचा घटक 'अ‌ॅक्टिव फार्मास्युटिकल इनग्रिडियंट (API) भारत मोठ्या प्रमाणात चीनकडून करतो. एपीआय तयार करणारे उद्योग भारतात पुरेसे नसल्याने भारत चीनवर अवलंबून आहे. मात्र, त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेसह इतर आघाड्यांवर चीनचा मुकाबला करताना भारताची अवस्था अपंगासारखी होत असल्याचे मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

'शेजारी देशावर एपीआयसाठी अवलंबून राहिल्याने सुरक्षेसह इतर विषयांवर मुकाबला करताना भारत कमजोर बनू शकतो. दोन्ही देशांमधील तणाव वाढतच राहीला तर बनावट औधषांमुळे भारतीय रुग्णांचा जीवही धोक्यात जाण्याची भीती आहे. गलवान व्हॅलीनंतर तर याची भीती आणखी वाढली आहे'.

'मोठ्या प्रमाणात एपीआय आयात करत असल्याने भारताची वैज्ञानिक क्षेत्रातील स्पर्धात्मकता कमी होत आहे. भारत फक्त औषधांचे अंतिम डोस तयार करणारा हब बनला आहे. आयात केलेल्या एपीआयवर प्रक्रिया करून फक्त अंतिम उत्पादन भारत तयार करत आहे', असे निरिक्षण न्यायालयाने नोंदविले.

भारत- चीन सीमावादानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशातील ही लढाई फक्त सीमेवरच नाही तर आर्थिक आघाडीवरही लढली जात आहे. चीन आपल्या बलाढ्य व्यापाराच्या जोरावरच जगभरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आयातीसाठी दुसऱ्या देशांवर विषेशत: चीनवर जास्त अवलंबून राहू नये म्हणून भारतानेही नुकतेच आत्मनिर्भर भारत अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत देशातील निर्मिती क्षेत्राला चालना देण्यात येत आहे. तर आयात कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

वैद्यकीय क्षेत्रास लागणाऱ्या कच्च्या मालासाठी भारत मोठ्या प्रमाणावर चीनवर अवलंबून आहे. फार्मा उद्योगासाठी म्हणजे गोळ्या-औषधे तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल ज्याला वैद्यकीय भाषेत (API) अ‌ॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रिडियंट असे म्हणतात, तो चीनकडून येतो. या आयात होणाऱ्या या एपीआयवरच भारतीय फार्मा उद्योग चालतो. भारत मोठ्या प्रमाणात गोळ्याऔषधांचा निर्यातदार देखील आहे. मात्र, याची साखळी चीनमधून सुरू होते.

एपीआय आणि अनेक ऑरगॅनिक (सेंद्रिय) रसायने भारत चीनकडून मागवतो. चीनकडून भारताला होणारी एकूण फार्मास्युटिकल क्षेत्रातील आयात 1 हजार कोटी डॉलरच्या घरात आहे. फार्मा उद्योगातील 70 टक्के आयात भारताला चीनकडून होते. त्यावरून आपण समजू शकतो, चीनशिवाय आपली फार्मा इंडस्ट्री किती अपंग आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.