ETV Bharat / bharat

इंधन दरवाढ सुरुच; सलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात 60 पैशांची वाढ - business news

सलग पाचव्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. गुरुवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रतिलिटर 60 पैशांची वाढ केली. दिल्लीत प्रतिलिटर पेट्रोलसाठी 74 रुपये मोजावे लागलणार आहे. तर डिझेलचा दर 72.22 रुपये प्रतिलिटर इतका झाला आहे.

इंधन दरवाढ
इंधन दरवाढ
author img

By

Published : Jun 11, 2020, 10:17 AM IST

नवी दिल्ली - सलग पाचव्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. गुरुवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रतिलिटर 60 पैशांची वाढ झाली आहे. तब्बल ८३ दिवसांनंतर रविवारी प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ करण्यात आली होती.

दिल्लीत प्रतिलिटर पेट्रोलसाठी 74 रुपये मोजावे लागलणार आहे. तर डिझेलचा दर 72.22 रुपये प्रतिलिटर इतका झाला आहे. राज्य सरकारांनी विक्रीकर आणि इतर कर पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवर लावल्यामुळे संपूर्ण देशात इंधन दरात वाढ झाली आहे. बुधवारी हा दर प्रतिलिटर पेट्रोलसाठी 73.40 रुपये तर डिझेलचा 71.62 रुपये इतका होता.

रविवारपासून तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांच्या किंमतीचा उत्पादन खर्चासोबत तुलनात्मक आढावा घ्यायला सुरुवात केली. तेव्हापासून पेट्रोलमध्ये 2.74 रुपये आणि डिझेल 2.83 रुपये प्रतिलिटर एवढी दरवाढ झाली आहे.

लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर लोकांचे जीवन थोड्याप्रमाणात रुळावर येत असल्याने पेट्रोल-डिझेलच्या मागणीत वाढ होत आहे. येत्या काही दिवसात जनतेला कोरोनासह महागाईचा चटका सहन करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.