पणजी - भारतातील वैविध्य आणि सौंदर्य जगाला आकर्षित करण्याबरोबर देशाला जागतिक पातळीवर उच्चस्थानी नेऊन ठेवणारे आहे. मात्र, याकरिता आपली मानसिकता बदलून नवकल्पना सत्यात उतरविण्यासाठी धनापेक्षा धारणा बदलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी गुरुवारी येथे केले.
हेही वाचा - पाण्यावरून दोन भाजपशासित राज्यात वाद उकळला; गोवा सरकारची आक्रमक भूमिका
केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेंतर्गत उत्तर गोव्यातील किनारी भागातील पायाभूत सुविधा प्रकल्प शुभारंभ आणि गोवा पर्यटन खात्याच्या मोबाईल अॅप अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोव्याचे पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर, ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो, महापौर उदय मडकईकर, पर्यटन खात्याचे संचालक संजीव गडकर, अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा - परदेशातही बाप्पाची धूम, बहरीन देशात गणेश विसर्जन उत्साहात
योजने अंतर्गत उत्तर-गोवा किनारी भागातील अंजुणा-वागतोर, कांदोळी-बागा, केरी- मोरजी खिंड, आग्वाद किल्ला आणि कारागृह आदी ठिकाणी पर्यटकांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहे. यामुळे अधिकाधिक पर्यटक गोव्यात येण्यास मदत होईल. यामध्ये पर्यटकांसाठी मदत केंद्र असेल. तर गोवा पर्यटन अॅपच्या माध्यामातून पर्यटकांना गोव्यातील पर्यटकांसाठी अधिकाधिक आणि अचूक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे अॅप गोवा इलेक्ट्रिकल लिमिटेड या सरकारी कंपनीने तयार केले आहे.
हेही वाचा - पुनरागमनाचे अभिवचन घेऊनच मुख्यमंत्र्यांनी केले गणरायाचे पर्यावरणपूरक विसर्जन
पुढे बोलताना प्रल्हाद सिंह म्हणाले, पर्यटन मंत्री म्हणून काम करताना एखाद्या समस्येकडे पर्यटक म्हणून पाहत त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. याकरिता दिल्लीत बसून निर्णय न घेता स्थानिक पातळीवर परिस्थिती समजून घेत निर्णय घेतले पाहिजेत. स्वदेश दर्शनामध्ये सर्वात चांगले काम गोव्याने केले आहे. याचा दुसरा टप्पा पूर्ण केला तर तिसऱ्या टप्प्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
हेही वाचा - फिरोज शाह कोटला आता अरुण जेटली स्टेडीयम या नावाने, कोहलीचाही सन्मान
तसेच भारताला युनेस्कोमध्ये अधिकाधिक स्थान मिळावे म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. जागतिक पर्यटन स्तरावर 36 व्या स्थानी असलेल्या भारताने पहिल्या 10 यध्ये स्थान मिळवावे असा मानस आहे. म्हणूनच देशातील 17 पर्यटन स्थळांचा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नागरि सुविधा उपलब्ध करून विकास केला जात आहे. ज्यामध्ये गोव्याचाही समावेश आहे. तर 'स्वदेश दर्शन योजने' अंतर्गत केंद्र सरकारने गोव्याला 199.34 कोटी अनुदान मंजूर केले आहे. यापैकी पहिल्या टप्प्यातील 99.99 कोटी रुपयांची कामे गोव्याने पूर्ण केली आहेत, असेही त्यांनी सांगितले.