पुणे - शहरात सध्या मेट्रोच्या कामाला वेग आला असून पहिल्या टप्प्यात पिंपरी ते शिवाजीनगर मार्गाचे काम सध्या युध्दपातळीवर सुरू आहे. शहराच्या मध्यभागातील कसबा पेठेत या मार्गावर एक स्थानक होणार आहे. मात्र, इथल्या स्थानिकांनी या स्थानकाला विरोध केला आहे.
हे स्थानक होऊ देणार नाही, या मागणीसाठी पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरासमोर आज आंदोलन करण्यात आले. मेट्रोच्या पहिल्या टप्यात कसबा पेठेत मेट्रोचे स्थानक होत असून यामुळे दोनशे ते तीनशेकुटुंब प्रभावित होणार आहेत.
मेट्रोच्या अधिकाऱयांनी याचा सर्व्हे केला असून या स्थानकामुळे इथल्या ऐतिहासिक स्थळांना धक्का लागणार आहे. येथील कुंटुंबांची आर्थिक कोंडीही होणार आहे. त्यामुळे हे स्टेशन होऊ देणार नाही, अशी भूमिका इथल्या रहिवाशांनी घेतली आहे.
कसबा पेठेत मेट्रो स्थानकाला पुणेकरांचा विरोध - kasba ganpati
मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी याचा सर्व्हे केला असून या स्थानकामुळे इथल्या ऐतिहासिक स्थळांना धक्का लागणार आहे. येथील कुंटुंबांची आर्थिक कोंडीही होणार आहे. मेट्रोच्या पहिल्या टप्यात कसबा पेठेत मेट्रोचे स्थानक होत असून यामुळे दोनशे ते तीनशे कुटुंब प्रभावित होणार आहेत.