ETV Bharat / bharat

पतंजलीचे कोरोनावरील औषध वादाच्या भोवऱ्यात; 'आयुष' मंत्रालयाने मागितले दाव्यांचे पुरावे..

author img

By

Published : Jun 23, 2020, 6:56 PM IST

Updated : Jun 23, 2020, 7:09 PM IST

कंपनीने या औषधामुळे कोरोनाचा रुग्ण साधारणपणे ५ ते १४ दिवसांमध्ये बरा होऊ शकतो असा दावा केला होता. मात्र, आयुष मंत्रालयाने याबाबात पुरावे मागितले असून, यासंदर्भात केल्या गेलेल्या संशोधनाचे अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश पतंजलीला देण्यात आले आहेत.

Patanjali asked to provide details of medicine Coronil by AYUSH
पतंजलीचे कोरोनावरील औषध वादाच्या भोवऱ्यात; 'आयुष' मंत्रालयाने मागितले दाव्यांचे पुरावे..

नवी दिल्ली - मोठ्या थाटामाटात आज लॉंच करण्यात आलेले पतंजलीचे कोरोनावरील औषध वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. कंपनीने या औषधामुळे कोरोनाचा रुग्ण साधारणपणे ५ ते १४ दिवसांमध्ये बरा होऊ शकतो असा दावा केला होता. मात्र, आयुष मंत्रालयाने याबाबात पुरावे मागितले असून, यासंदर्भात केल्या गेलेल्या संशोधनाचे अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश पतंजलीला देण्यात आले आहेत.

'आयुष'ने जारी केलेल्या एका सूचनेनुसार, मंत्रालयाने पतंजलीच्या या दाव्यांची गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यामुळेच, आयुषने कंपनीला या औषधामध्ये वापरण्यात आलेल्या घटकांची महिती मागवली आहे. तसेच, यावेळी कंपनीकडून करण्यात आलेल्या संशोधनाचीही संपूर्ण माहिती मंत्रालयाकडे सादर करण्याचे आदेश कंपनीला देण्यात आले आहेत.

  • Ministry has taken cognizance of news in media about Ayurvedic medicines developed for #COVID19 treatment by Patanjali Ayurved Ltd. The company asked to provide details of medicines & to stop advertising/publicising such claims till the issue is duly examined: Ministry of AYUSH pic.twitter.com/OBpQlWAspu

    — ANI (@ANI) June 23, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कंपनीला याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, की अशा प्रकारचे दावे करणे हे ड्रग्स अ‌ँड मॅजिक रेमेडीज (आक्षेपार्ह जाहीराती) कायदा, १९५४; आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियमांनुसार बेकायदेशीर आहे. त्यामुळे याबाबत केलेल्या संशोधनाची माहिती, आणि चाचण्यांचा अहवाल सादर करण्याचा आदेश कंपनीला देण्यात आला आहे.

तसेच, ही सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अशा प्रकारचा कोणताही दावा कंपनीने करू नये, असे आदेश कंपनीला देण्यात आले आहेत.

पतंजलीच्या या औषधाचे नाव 'दिव्य कोरोनील' असे आहे. पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूट आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, जयपूर यांनी संयुक्तपणे या औषधाची निर्मिती केली आहे. या औषधाची वैद्यकीय चाचणी शेवटच्या टप्प्यात असल्याचेही पतंजलीने स्पष्ट केले आहे. सध्या याचे उत्पादन हरिद्वारमधील दिव्य फार्मसी आणि पतंजली आयुर्वेद या दोन्ही कंपन्या मिळून करत आहेत.

या औषधाच्या जयपूर आणि इंदूरमध्ये झालेल्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये १००टक्के यश मिळाल्याचे पतंजलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बालाकृष्णा यांनी म्हटले होते. कोरोनीलच्या वापराने कोरोनाचा रुग्ण साधारणपणे ५ ते १४ दिवसांमध्ये बरा होऊ शकतो, असा दावाही त्यांनी केला होता.

हेही वाचा : कोरोनासाठी भारतात चौथे औषध; पतंजलीचे 'कोरोनील' लॉंच..

Last Updated : Jun 23, 2020, 7:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.