ETV Bharat / bharat

संसदीय समितीच्या बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आवश्यक; अन्यथा सरकारच्या कृतींचे निरीक्षण अशक्य - थरूर - शशी थरूर न्यूज

‘लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदीय समितीच्या बैठका नियमांमध्ये औपचारिकरीत्या बदल केल्याशिवाय व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होऊ शकत नाहीत’, असे आपल्याला कळवल्याचे काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरूर यांनी बुधवारी म्हटले आहे. आता पॅनेल संसदीय निरीक्षणाची आवश्यकता असणार्‍या महत्त्वाच्या मुद्द्यांवरील प्रश्न मंत्रालयाला ईमेलमार्फत प्रश्न विचारेल, असे सूत्रांनी सांगितले.

शशी थरूर न्यूज
शशी थरूर न्यूज
author img

By

Published : Jun 11, 2020, 9:40 AM IST

नवी दिल्ली - ‘लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदीय समितीच्या बैठका नियमांमध्ये औपचारिकरीत्या बदल केल्याशिवाय व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होऊ शकत नाहीत’, असे आपल्याला कळवल्याचे काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरूर यांनी बुधवारी म्हटले आहे. ‘असे केल्यास सरकारच्या कृतींचे योग्य प्रकारे निरीक्षण करण्याची शक्यता धूसर बनेल,’ असे अध्यक्षांनी म्हटल्याचे थरूर यांनी ट्विट करून सांगितले आहे.

थरूर यांच्या अध्यक्षतेखालील माहिती तंत्रज्ञान समितीच्या संसदीय समितीची 17 जूनला बैठक होणार होती. यादरम्यान माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना सरकारच्या कोरोनव्हायरस-ट्रॅकिंग 'आरोग्य सेतू अ‌ॅप'बद्दल माहिती देण्यास बोलावले होते. यामध्ये या अ‌ॅपसंबंधी माहितीची सुरक्षा आणि नागरिकांच्या गोपनीयतेशी संबंधित मुद्दे आणि समस्यांवर चर्चा होणार होती.

  • Hon.Speaker @ombirlakota informed me today that ParliamentaryCommittees cannot meet virtually without the rules being formally amended,under a procedure that will involve the RulesCommittee&be passed by the whole Parliament. This has stymied the prospects of meaningful oversight.

    — Shashi Tharoor (@ShashiTharoor) June 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

याआधी माहिती तंत्रज्ञान पॅनेलसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे थरूर यांची बैठक होणार होती. मात्र, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद व्हावा की, थेट समोरासमोर संवाद व्हावा, याविषयी स्पष्टता नसल्याने ती रद्द करण्यात आली. कारण, यासाठी लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांनी ‘संसदीय समितीच्या बैठकांसाठीच्या नियमांमध्ये औपचारिकरीत्या बदल होण्याची आवश्यकता आहे’, असे आपल्याला कळवल्याचे थरूर यांनी ट्विटद्वारे सांगितले.

'संसदीय जबाबदारी ही आपल्या लोकशाहीच्या घटनात्मक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी आहे. त्यासाठी पाठपुरावा करण्यात अपयशी होणे, हा त्या जबाबदारीला बसलेला धक्का आहे. मी आतापुरते बैठका न घेता आमचे कार्य ईमेलद्वारे करण्याचे मार्ग शोधत आहे,' असे थरूर यांनी पुढे म्हटले आहे.

सध्या कोविड-19 चे वाढते रुग्ण पाहता रोगप्रसार टाळण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक घ्यावी, अशी मागणी थरूर यांनी लोकसभा अध्यक्षांकडे वारंवार केली होती. यासाठी ब्रिटनमधील हाउस ऑफ कॉमन्समध्ये अशा प्रकारे बैठका होत असल्याचे उदाहरण त्यांनी दिले होते. तसेच, पंतप्रधान प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आणि प्रश्नाकालातील चर्चेसाठीही याचा उपयोग होत असल्याचे त्यांनी म्हटले होते. अशाच प्रकारे भारतातही कामकाज चालू ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करणे शक्य असल्याचे थरूर यांनी म्हटले होते.

आता पॅनेल संसदीय निरीक्षणाची आवश्यकता असणार्‍या महत्त्वाच्या मुद्द्यांवरील प्रश्न मंत्रालयाला ईमेलमार्फत प्रश्न विचारेल, असे सूत्रांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.