श्रीनगर - पाकिस्तानी लष्कराने आज (शुक्रवारी) जम्मू काश्मीरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. नौशेरा सेक्टरमध्ये सायंकाळी ५ ते ७ च्या दरम्यान पाकिस्तानी सैन्याने अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये भारतीय जवान सुभाष थापा हुतात्मा झाले आहेत.
-
Jammu and Kashmir: Pakistan violated ceasefire in Nowshera sector today from 0550 to 0730 hours. One security personnel Naik Subash Thapa who got injured & was taken to Command Hospital in Udhampur later succumbed to injuries.
— ANI (@ANI) October 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Jammu and Kashmir: Pakistan violated ceasefire in Nowshera sector today from 0550 to 0730 hours. One security personnel Naik Subash Thapa who got injured & was taken to Command Hospital in Udhampur later succumbed to injuries.
— ANI (@ANI) October 11, 2019Jammu and Kashmir: Pakistan violated ceasefire in Nowshera sector today from 0550 to 0730 hours. One security personnel Naik Subash Thapa who got injured & was taken to Command Hospital in Udhampur later succumbed to injuries.
— ANI (@ANI) October 11, 2019
उधमपूर येथील कमांड रुग्णालयात त्यांना जखमी अवस्थेत दाखल करण्यात आले होते. मात्र, गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
पाकिस्तानने या वर्षीच्या पहिल्या ९ महिन्यांमध्ये जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे सर्वांत जास्त उल्लघंन केले आहे. २ ऑक्टोबरपर्यंत २ हजार २२५ वेळा म्हणजेच एका दिवसांमध्ये आठवेळा नियंत्रण रेषेचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला आहे.
२०१८ मध्ये पाकिस्तानने १ हजार ६२९ वेळा नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला होता. तर, लष्कराने २०१८ मध्ये २५४ तर २०१७ मध्ये २१३ आणि या वर्षीच्या २ ऑक्टोबरपर्यंत तब्बल १४० दहशतवाद्यांना मारले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
पाकिस्तानमध्ये भारतीय हवाई दलाने बालाकोट एअर स्ट्राईक केली होती. त्यानंतर पाकिस्तानकडून वारंवार नियत्रंन रेषेचे उल्लंघन करण्यात आले. जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर यामध्ये वाढ झाली. मात्र, त्यांच्या प्रत्येक हल्ल्याला भारताने जशास तसे उत्तर दिले आहे.