नवी दिल्ली - पाकिस्तान सरकार काश्मीर मुद्दा आंतरराष्ट्रीय न्यायलयात नेणार असल्याची माहिती पाकिस्तानी माध्यमांनी दिली आहे. या मुद्दयाच्या सर्व बाजू तपासून पाहिल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे पाकिस्तानच्या माध्यमांनी म्हटले आहे. एएनआयने या संबधीचे वृत्त दिले आहे.
-
Pakistani government has decided to approach the International Court of Justice over Kashmir issue: Pakistan media pic.twitter.com/SAnOeeSCwe
— ANI (@ANI) August 20, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Pakistani government has decided to approach the International Court of Justice over Kashmir issue: Pakistan media pic.twitter.com/SAnOeeSCwe
— ANI (@ANI) August 20, 2019Pakistani government has decided to approach the International Court of Justice over Kashmir issue: Pakistan media pic.twitter.com/SAnOeeSCwe
— ANI (@ANI) August 20, 2019
भारताने जम्मू काश्मीरचा विषेश दर्जा रद्द केल्यानंतर पाकिस्तानची आगपाखड सुरू आहे. या मुद्यावर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये चर्चा पार झाली आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविणे ही भारताची अंतर्गत बाब आहे, असे संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी राजदूत सय्यद अकबरुद्दीन म्हणाले आहेत. मात्र, पाकिस्तान हा द्विपक्षीय मुद्दा असल्याचे म्हणत भारताविरोधात वातावरण निर्मिती करत आहे.
आता पाकिस्तान सरकार आंतरराष्ट्रीय न्यायलयात जाण्याचा विचार करत आहे. काश्मीर मुद्द्यावर एकही देशाने पाकिस्तानच्या बाजूने उघडपणे पाठिंबा दिला नाही. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये बंद दरवाज्याआड चर्चा झाली. मात्र, यातूनही पाकिस्तानच्या हाती काही लागले नाही.