नवी दिल्ली - स्वातंत्र्य लढ्यात निधड्या छातीने हौतात्म्याला सामोरे जाणाऱ्या शहीद भगत सिंग यांची आज (२८ सप्टेंबर) १२२ वी जयंती आहे. भगत सिंग यांच्या जयंती निमित्त त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात यावे, अशी मागणी पाकिस्तानमधून होत आहे. पाकिस्तानातील उच्च न्यायालयामध्ये वकील आणि शहिद भगत सिंग फाउंडेशनचे अध्यक्ष इम्तियाज रशिद कुरेशी यांनी ही मागणी केली आहे.
हेही वाचा - नौदलाची ताकद वाढली.. 'आयएनएस खांदेरी' पाणबुडीचे राजनाथ सिंह यांच्या हस्ते लोकार्पण
कुरेशी यांनी पंतप्रधान मोदींना याबाबत पत्रही लिहले आहे. भगत सिंग यांची १२२ वी जयंती देशभरात साजरी केली जात असताना पाकिस्तानातूनही भगत सिंग यांना प्रेम मिळत आहे. भारताच्या सर्वोच्च पुरस्कारासह पाकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार निशान -ए- पाकिस्तान भगत सिंह यांना दिला जावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा - काश्मीरमधील मुस्लिमाची काळजी पण चीनमधल्या मुस्लिमांचं काय?, अमेरिकेचा पाकिस्तानला प्रश्न
इम्तियाज रशिद कुरेशी शहिद भगत सिंग फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. भारत सरकार आमची मागणी मान्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. भगत सिंग यांना सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात यावे, ही मागणी पाकिस्तानातील मुस्लिमांची नाही, तर जगातील सर्व मुस्लिम समुदायाची आहे. तसेच भगत सिंग यांच्या संदर्भातील खटले न्यायालयात लढत असल्याचे कुरेशी यांनी सांगतले. भगत सिंग यांचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान असून त्यांच्यावर सर्वजण प्रेम करत असल्याचे कुरेशी म्हणाले.