Diy Pumpkin Face Mask: सनासुदीच्या काळात आपली त्वचा तेजस्वी आणि आकर्षक दिसावी असं कोणाला वाटत नाही? याकरिता विविध प्रकारचे प्रोडक्ट बाजारात उपलब्ध आहेत. परंतु केमिकलयुक्त ब्युटी प्रोडक्टमुळं चेहऱ्याचं नुकसान होईल ही भिती सर्वांना असते. मात्र, आता तुम्ही घरबसल्या तुमचं सौंदर्य वाढवू शकता. कारण आम्ही तुमच्यासाठी एका नैसर्गिक फेस मास्क बद्दल माहिती घेऊन आलोय. आपल्या स्वयंपाक घरात उपलब्ध असलेला भोपळा केवळ खाण्यायोग्य नसून सौंदर्य द्विगुणित करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. भोपळ्यामुळं रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसंच व्हिटॅमिन अ, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी, ओमेगा -3 फॅटी ऍसिडस्, जस्त, सेलेनियम, लोह, मॅग्नेशियम आणि बीटा कॅरोटीन अशा विविध पोषक घटकांनी भोपळा समृद्ध आहे. त्वचेवरील डाग, मुरूम, सुरकुत्या, ब्लॅक स्पॉट कमी करण्यासाठी भोपळ्याचा फेसपॅक अत्यंत उपयुक्त आहे.
- ते त्वचेसाठी चांगलं आहे का? अँटिऑक्सिडंटनं समृद्ध भोपळ्यामुळं त्वचेवरील सुरकुत्या आणि रेषा कमी होतात. शिवाय भोपळा मऊ आणि चमकदार त्वचा देखील प्रदान करतं. यामध्ये असलेलं बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन-अ खराब झालेल्या त्वचेवर नवीन पेशी तयार करण्यास शरीराला उत्तेजित करतं. याशिवाय पिगमेंटेशनची समस्याही दूर करते. त्यासोबतच यामध्ये असलेलं झिंक त्वचेचं सूर्यापासून होणाऱ्या हानिकारक UV किरणांपासून संरक्षण करतं. एवढंच नाही तर त्वचेवर येणारं पुरळ सुद्धा प्रतिबंधित करतं. भोपळ्यातील नैसर्गिक एन्झाईम्स त्वचेला निरोगी त्वचा आणि केसांना उपयुक्त पोषक घटक देतात.
- फेसपॅककरिता आवश्यक साहित्य
- एक चतुर्थांश कप भोपळा
- एक चमचा मध
- दालचिनी पावडर
- असा तयार करा भोपळ्याचा फेस पॅक: सर्वात आधी भोपळ्याची साल काढून पेस्ट तयार करा. आता एका मिक्सिंग बाऊलमध्ये भोपळा, मध, दालचिनी पावडरचं मिश्रण तयार करा. हे मिश्रण चेहरा मान आणि हातावर लावा. 15 मिनिट तसंच राहू द्या. त्यानंतर थंड पाण्यानं चेहरा धूवा. चांगल्या परिणामासाठी चेहरा धूतल्यानंतर स्किन टोनर किंवा मॉइश्चरायझर लावा. यामुळं चेहरा चमकदार आणि मऊ होईल.
- भोपळ्याचा स्क्रब: एक मिक्सिंग बाऊल घ्या. त्यात 2 चमचे भोपळ्याची पेस्ट, लिंबाचा रस, मध, आणि एक चमचा दही घाला. हे मिश्रण एकजीव करून घ्या. आता मिश्रण चेहऱ्याला लावा आणि पाच मिनिटं हलक्या हातानं मसाज करा. यामुळं चेहऱ्यावरील काळपटपणा कमी होईल आणि चेहरा चमकदार दिसेल.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
हेही वाचा