नवी दिल्ली - पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर (एलओसी) होणारी घुसखोरी रोखण्यात भारताला यश आले आहे. दरम्यान, पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सने (आयएसआय) दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईद आणि हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन यांची भेट घेतली. पाक गुप्तचर संस्थेने या दोघांना काश्मीर खोऱ्यात अशांती पसरवण्यासाठी दहशतवादी पाठवण्यास सांगितले. एका वरिष्ठ सरकारी सूत्रांनी सोमवारी ही माहिती दिली.
अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने सलाहुद्दीन आणि सईद यांना याआधीच 'जागतिक दहशतवादी' घोषित केले आहे.
भारत-पाक सीमा ओलांडून भारतात दहशतवाद्यांची घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानच्या आयएसआयने 4 ऑक्टोबर 2020 रोजी कोटली येथे आणि 7 ऑक्टोबर 2020 रोजी कोटली येथे दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांशी उच्चस्तरीय बैठक घेतली.
या सभेला सय्यद सलाहुद्दीन आणि हाफिज सईद तसेच सर्व लॉन्च पॅडचे कमांडर्स, विविध तंझिमचे मार्गदर्शक आणि इतर प्रमुख दहशतवाद्यांनी हजेरी लावली होती.
हेही वाचा - अल कायदाची तालिबानशी जवळीक राहणारच - संयुक्त राष्ट्र अधिकारी
प्रत्येक तंजीमला 20 लाख रुपये देण्यात आले आहेत आणि दहशतवादी घुसवण्याचे आणि विघातक कारवाया करण्याचे संचलन यशस्वी झाल्यास अतिरिक्त 30 लाख रुपये देण्याचे आश्वासनही आयएसआयने दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांना दिले आहे, असे सूत्रांनी सांगितले.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) नियंत्रण रेषेपलीकडे सुमारे 270 ते 300 दहशतवादी विविध लाँच पॅडमध्ये तळ ठोकून आहेत. हिवाळ्यात जोरदार बर्फ पडण्यापूर्वी ते खोऱ्यात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सूत्रांनी पुढे सांगितले.
जम्मू-काश्मीरमध्ये आणि भारत-पाकिस्तानदरम्यानच्या नियंत्रण रेषेवरील घुसखोरी मोठ्या प्रमाणात ठप्प झाली असल्याचेही आढळून आले आहे. नियंत्रण रेषा ही काश्मीरच्या प्रदेशात भारत आणि पाकिस्तान दरम्यानची वास्तविक सीमा आहे. गेल्या वर्षी येथे 130 हल्ले झाले होते आणि यावर्षी आतापर्यंत 27 जण मृत्यूमुखी पडले आहेत.
या व्यतिरिक्त, नियंत्रण रेषेजवळ काही लॉन्च पॅडवर बॉर्डर अॅक्शन टीमची (बीएटी) कारवाई सक्रिय झाली आहे.
हेही वाचा - लिबियाच्या सामूहिक कबरींमध्ये सापडले 12 मृतदेह
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किरेन सेक्टरसमोरील अठमुकाम, दुध्यानियाल आणि ठंडापानी भागातील लॉन्च पॅडवर 80 दहशतवाद्यांचा गट दिसला आहे.
जैश-ए-मोहम्मद आणि लश्कर-ए-तैयबासमवेत, 10 दहशतवाद्यांचा गट नीलम खोऱ्याजवळील तंगधार सेक्टरसमोर घुसखोरीची योजना तयार करीत आहे. त्यांनी बीएटीकडून होणाऱ्या कारवाईविरोधातही योजना आखली आहे. या व्यतिरिक्त, 40 दहशतवाद्यांचा एक गट पूंछ प्रदेशाच्या समोरच्या बाजूस आढळला होता. त्यांनी सुजियान प्रदेशातील जैश-ए-मोहम्मद आणि पाकिस्तानच्या अल बदर गटातील खेडे गावांमध्ये तळ ठोकला होता.
मदारपूर आणि नटार भागात कृष्णाघाटीसमोर 20 दहशतवाद्यांचा समूह आढळल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.
याशिवाय, भीमबर गली कॅम्पसमोरही 35 दहशतवाद्यांचा आणखी एक गट घुसखोरीच्या तयारीत असलेला दिसला.
हेही वाचा - मतदारांना आपल्या बाजूने झुकवण्यासाठी ट्रम्प यांच्याकडून 'भीती'च्या अस्त्राचा वापर