नवी दिल्ली - केंद्र सरकारकडून पद्मविभूषण, पद्मभूषण सोबत पद्मश्री पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी 118 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यात 1984 मधील भोपाळ वायूगळती प्रकरणातील कार्यकर्ते अब्दुल जब्बार यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
गेल्या वर्षी 14 नोव्हेंबर 2019 ला त्यांचे निधन झाले. तसेच प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, समाजसेवक पोपटराव पवार यांचाही समावेश आहे.
यासोबतच सामाजिक कार्यकर्ते जावेद अहमद टेक, सत्यनारायण मुनडयूर, एस रामकृष्ण यांचाही यात समावेश आहे.
एकूण 118 जणांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.