ETV Bharat / bharat

भारताचे सुपुत्र पी. व्ही. नरसिंहराव राजकारणातील संन्यासी - डॉ. मनमोहन सिंह

भारताचे माजी पंतप्रधान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. व्ही. नरसिंहराव हे राजकारणातील संन्यासी होते, या शब्दात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. पी. व्ही. नरसिंहराव यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्ताने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी नरसिंहराव यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.

p v narsimharao was ascetic in politics said former pm dr. manmohan singh
भारताचे सुपुत्र पी. व्ही. नरसिंहराव राजकारणातील संन्यासी - डॉ. मनमोहन सिंह
author img

By

Published : Jun 28, 2020, 6:01 AM IST

Updated : Jun 28, 2020, 9:05 AM IST

हैदराबाद - भारताचे माजी पंतप्रधान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. व्ही. नरसिंहराव हे राजकारणातील संन्यासी होते, या शब्दात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. पी. व्ही. नरसिंहराव यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्ताने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी नरसिंहराव यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.

डॉ. सिंह लिहतात, श्रीयुत पी. व्ही. नरसिंह राव यांचा आणि माझा परिचय १९८८ मध्ये झाला. त्यावेळी ते परराष्ट्रमंत्री होते आणि मी दक्षिण आयोगाचा सरचिटणीस होतो. ते जिनिव्हाला आले होते, त्यावेळी आमची भेट झाली. १९९१ मध्ये सरकार स्थापनेच्या दिवशी श्री. पी.व्ही. नरसिंग राव यांनी मला फोन केला आणि म्हणाले, ‘या, मला तुम्हाला अर्थमंत्रीपद द्यायचे आहे.’ मी राष्ट्रपती भवनात शपथ घ्यायला गेलो, तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले होते. अर्थमंत्री हे पद स्वीकारण्याआधी मी श्री. नरसिंह राव यांना म्हणालो, तुमचे पाठबळ असेल तरच मी हे पद स्वीकारतो. त्यांनी यावर गमतीने उत्तर दिले. ते म्हणाले, ‘तुम्हाला पूर्ण मोकळीक मिळेल. जर राजकारण यशस्वी झाले तर आपण सगळे जण श्रेय घेऊ. पण, ते अयशस्वी झाले तर मात्र तुम्हाला जावे लागेल.’

शपथविधी समारंभानंतर पंतप्रधानांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांबरोबर बैठक ठेवली होती. मी त्यांना माहिती दिली. मला असे वाटले, विरोधक एकदम स्तंभित झाले. पंतप्रधानांनी मला आर्थिक सुधारणा करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. आर्थिक सुधारणा काही लगेचच झाल्या नाहीत. त्यावेळचे ऐतिहासिक बदल हे दूरदृष्टी असलेल्या राजकीय नेतृत्वाशिवाय झाले नाहीत. श्रीमती इंदिरा गांधी आपल्या आर्थिक धोरणांना नवी दिशा देण्याचे महत्त्व समजून घेणाऱ्या, सामाजिक न्यायाबरोबर आर्थिक विकासाला गती देणाऱ्या पहिल्या राजकीय नेत्या होत्या. त्यांनी जी सुरुवात केली होती त्याला श्री. राजीव गांधींनी पुढे चालना दिली.

नव्या माहिती युगाचे महत्त्वही त्यांनी समजून घेतले. १९८०च्या उत्तरार्धात राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली आर्थिक सुधारणा पुढे राबवण्यात आल्या. नरसिंग राव यांनी ज्या धाडसाने आर्थिक सुधारणांची नस पकडली, त्याबद्दल त्यांना आपण आदरांजली वाहिली पाहिजे.

१९९१ मध्ये जेव्हा श्री. नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार स्थापन झाले तेव्हा मी अर्थमंत्री म्हणून अनेक आर्थिक सुधारणांची सुरुवात केली. पंतप्रधान नरसिंह राव यांच्या नेतृत्त्वात आम्ही आर्थिक आणि परराष्ट्र धोरणांसंबंधी ऐतिहासिक निर्णय घेतले. आम्ही भारताचे वेगळे स्वरूप लक्षात घेऊन सुधारणांचा महत्त्वाचा पैलू आणला.

आम्ही आधीच्या सूत्रांना चिकटून राहिलो नाही. मला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे त्यावेळचे व्यवस्थापकीय संचालक श्रीयुत मायकल कॅमेडियस आणि पंतप्रधान नरसिंह राव यांच्यातील बैठक आठवते. नरसिंह रावजी यांनी त्यांना सांगितले की, भारतात सुधारणा या भारतीयांना विचारात घेऊनच झाल्या पाहिजेत. आम्ही लोकशाहीवादी आहोत. आमच्या कर्मचाऱ्यांचे हित जपले पाहिजे. आम्ही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला सांगितले की, आपल्या स्ट्रक्चरल अॅडजेस्टमेंट प्रोग्राममुळे सार्वजनिक क्षेत्रातल्या एकाही कर्मचाऱ्याची नोकरी जाता कामा नये. मला वाटते की, आम्ही आमच्या प्राथमिकतेला योग्य अशाच सुधारणा करू हा विश्वास दिला.

पंतप्रधान नरसिंह रावजी यांनी भारतीय परराष्ट्र धोरणात वास्तववाद समोर आणला. त्यांनी शेजारी देशांची असलेले संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला. १९९३ मध्ये रावजी यांनी कटुता कमी करण्यासाठी चीनला भेट दिली होती. भारताने सार्कच्या इतर देशांबरोबर दक्षिण आशियायी प्राधान्य व्यापार करार केला. त्यांनी भारताची ‘लूक इस्ट पॉलिसी’ आणली यामुळे भारत अनेक पूर्व आणि दक्षिण-पूर्व आशियाई देशांशी जोडला गेला.

नरसिंहरावजी यांच्या नेतृत्वात सरकारने भारताच्या बाह्य सुरक्षा कार्यक्रमाला चालना देण्यासाठी महत्त्वाकांक्षी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान कार्यक्रम सुरू केला आणि १९९२ मध्ये ऑगमेंटेड उपग्रह प्रक्षेपण वाहन (एएसएलव्ही) आणि ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (पीएसएलव्ही) ची यशस्वी चाचणी केली. १९९४ मध्ये पृथ्वी क्षेपणास्त्राच्या पहिल्या यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या आणि त्याचबरोबर मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकसित केले.

भारताच्या या महान सुपुत्राच्या आठवणींना आदरांजली देताना, मी समाधानी आहे. ते अनेक प्रकारे मित्र, तत्त्वज्ञानी आणि मार्गदर्शक होते. मी त्यांना अनेक वेळा जवळून पाहिले आहे. राजकारणात ते संन्यासी होते. आपली परंपरा आणि नीत्तिमत्ता जपणारे ते आधुनिक होते. ते अतिशय विद्वान आणि राष्ट्रवादी होते. त्यांनी आपल्या फक्त अर्थव्यवस्थेला नव्हे तर विदेशी नीतीलाही नवी अर्थपूर्ण दिशा दिली. अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. यामुळेच करिमनगर असो, पुणे, बनारस आणि दिल्ली असो, त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी भारतीय बनले होते.

Last Updated : Jun 28, 2020, 9:05 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.