ETV Bharat / bharat

बिहार विधानसभा निवडणूक : 1157 उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी

author img

By

Published : Nov 8, 2020, 5:38 PM IST

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांमध्ये झाली. यात तिन्ही टप्प्यांमध्ये एकूण 3733 उमेदवार होते. यात 371 महिलांचाही समावेश आहे. यात 1157 लोकांना गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे.

Bihar  assembly polls
बिहार विधानसभा निवडणूक

नवी दिल्ली - बिहार राज्य विधानसभा निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तब्बल 1100 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. निवडणूक आयोगाचे जमा केलेल्या माहितीच्या आधारे ही माहिती समोर आली. बिहार निवडणूक तीन टप्प्यांमध्ये झाली. यात तिन्ही टप्प्यांमध्ये एकूण 3733 उमेदवार होते. यात 371 महिलांचाही समावेश आहे. यात 1157 लोकांना गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे.

या वर्षी फेब्रुवारीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शकतत्त्वांनुसार, निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना विचारणा केली होती. त्यात म्हटले होते की, राजकीय पक्ष गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना निवडणूक लढवण्याची परवानगी का देतात, याचे स्पष्टीकरण द्यावे. बिहार विधानसभेची निवडणूक पहिली अशी निवडणूक होती, ज्यात राजकीय पक्षांनी अशाप्रकारे उमेदवाराबाबत तपशील जाहीर केला.

यासंबंधीच्या जाहिराती कधी प्रसिद्ध आणि प्रसारित केल्या पाहिजेत, यावर सप्टेंबरमध्ये निवडणूक आयोगाने टाइमलाइन निश्चित केली होती. यानंतर निवडणूक आयोगाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांच्या प्रचाराचे नियम कठोर केले होते. ऑक्टोबर 2018 मध्ये, आयोगाने मार्गदर्शकतत्त्वे जारी केले होते, ज्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची माहिती जाहिरातीद्वारे टीव्ही आणि वृत्तपत्रांमध्ये निवडणुकीच्या काळात कमीतकमी तीन वेळा करणे आवश्यक होते.

हेही वाचा - बिहार निवडणूक : तिसऱ्या टप्प्यातील मतदानात महागठबंधन सर्वाधिक जागा जिंकणार - काँग्रेस

आता निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, माघार घेण्याच्या शेवटच्या तारखेच्या चार दिवस आधी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराचा तपशील सादर करावा लागेल. त्यात म्हटले आहे की, दुसरा तपशील माघारीच्या शेवटच्या तारखेच्या पाचव्या आणि आठव्या दिवसाच्या दरम्यान असावा. तर तिसरा आणि शेवटचा तपशील नवव्या दिवसापासून प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे मतदानाच्या दोन दिवस आधी असावा. या टाइमलाइनमुळे मतदारांना आपल्या उमेदवाराची निवड करणे सुलभ होईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.