जम्मू काश्मीर - दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जम्मू काश्मीर पोलिसांचा आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या दोन जवानांना वीरमरण आले आहे. उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ही घटना घडली असून परिसरात शोध मोहीम राबवली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामुल्ला परिसरातील क्रिरी चेक नाक्यावर दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात एक पोलीसाला जागीच वीरमरण आले असून मुझफ्फर अहमद, असे या पोलिसाचे नाव आहे. त्यांच्या छातीत आणि पोटात गोळी लागली होती. तर सीआरपीएफचे दोन जवान गंभीर जखमी झाले होते. मात्र, उपाचारादरम्यान श्रीनगरच्या रुग्णालयात या दोन जवानांना देखील वीरमरण आले.
हेही वाचा - जम्मू काश्मीर: अनंतनाग चकमकीत दोन अतिरेक्यांचा खात्मा..
यानंतर जम्मू काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने परिसरात शोध मोहीम सुरू केली असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. मागील ४ दिवसांत दहशतवाद्यांचा हा चौथा हल्ला असून शुक्रवारी देखील पोलिसांच्या छावणीवर हल्ला करण्यात आला होता. यात एका पोलिसाला वीरमरण आले होते, एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला होता.
हेही वाचा - श्रीनगरच्या नौगाम बायपासजवळ अज्ञात दहशतवाद्यांचा पोलिसांवर हल्ला, दोघांना वीरमरण