पाटणा - केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांनी सोमवारी 'वन नेशन वन रेशन कार्ड' योजनेची घोषणा केली. देशभरात ही योजना एक जूनपासून लागू होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
या योजनेमुळे नागरिकांना वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे रेशन कार्ड घ्यावे लागणार नाही. रेशन कार्ड धारकांना, एकाच कार्डवर देशभरात कुठेही असताना लाभ घेता येणार आहेत, अशी माहिती पासवान यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. याआधी एक जानेवारीला पासवान यांनी ही योजना देशातील १२ राज्यांमध्ये सुरू केली गेली असल्याचे जाहीर केले होते.
तर, ३ डिसेंबर २०१९ला पासवान यांनी या योजनेची घोषणा केली होती. यावेळी त्यांनी असे जाहीर केले होते, की ३० जून २०२० पूर्वी एक देश एक रेशनकार्ड ही योजना देशभरात यशस्वीपणे लागू करण्यात येईल.
हेही वाचा : आंध्र प्रदेशमध्ये असणार तीन राजधान्या; अमरावतीसह विशाखापट्टणम अन् कर्नुल या तीन शहरांना मान्यता!