हैरदाबाद - लॉकडाउन दरम्यान सर्वत्र दारूची दुकाने बंद असल्याने तिघांनी वैद्यकीय वापरातील स्पिरीट प्यायल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
इरागवरम गावातील एकूण सहा जणांनी स्पिरिटरूपी अल्कोहोलचे सेवन केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यातील तिघांना याची कोणतीही बाधा झाली नाही. मात्र, अन्य दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
संबंधितांनी 29 मार्चला स्पिरिट प्यायले. यानंतर पुढच्याच दिवशी यातील तिघे आजारी पडले. अल्लादी वेंकटेश आणि विरेश या दोघांना तनुकू जिल्ह्याच्या ठिकाणी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच त्यांच्यासोबत दाखल करण्यात आलेल्या नवीन मूर्ती राजू या व्यक्तीला मृत घोषित करण्यात आले. मृताच्या भावाने सांगितल्यानुसार, नवीन याला प्रथमत: रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मल्टिस्पेशिअलिटी रुग्णालयात हालवण्याचे सुचवले. यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले.
याबाबत इरागवारा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सतीश यांनी अधिक माहिती दिली आहे. पोलीस उर्वरित कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत असून तक्रार दाखल करणार असल्याचे ते म्हणाले.