ETV Bharat / bharat

पाकिस्तानला शस्त्र पुरवठा करणार नाही, भारताच्या विनंतीनंतर रशियाचा निर्णय - सूत्र - भारत रशिया संबंध

एससीओच्या बैठकीसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तीन दिवसांच्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. राजनाथ सिंह आणि रशियाचे संरक्षण मंत्री सेर्गी शोयगू यांच्यात सुमारे एक तास बैठक झाली. संरक्षण, सुरक्षा या विषयांसह द्विपक्षीय सहकार्याच्या विविध मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

no arms supply to Pakistan
राजनाथ सिंह
author img

By

Published : Sep 4, 2020, 7:14 PM IST

मॉस्को - पाकिस्तानला शस्त्र पुरवठा करणार नाही, या धोरणाचा रशियाने पुनरुच्चार केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. भारताने तशी विनंती केली होती. त्यानंतर रशियाने हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. शाघांई को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रशियाला गेले आहेत. यावेळी रशियाचे संरक्षण मंत्री सेर्गी शोयगू यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत रशियाने या धोरणाचा पुनरुच्चार केल्याचे सुत्रांकडून समजले आहे.

  • 11th edition of Indra Navy exercise (in file pics), a biennial bilateral maritime exercise between Indian Navy & Russian Navy scheduled to begin in the Bay of Bengal from 4th to 5th Sep 2020: Spokesperson, Indian Navy pic.twitter.com/JU87nugKgB

    — ANI (@ANI) September 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

एससीओच्या बैठकीसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तीन दिवसांच्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. सिंह आणि सेर्गी यांच्यात सुमारे एक तास बैठक झाली. संरक्षण, सुरक्षा या विषयांसह द्विपक्षीय सहकार्याच्या विविध मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. संरक्षण आणि सामरिकदृष्या महत्त्वाच्या विषयांवर दोन्ही देशांमध्ये सखोल चर्चा झाल्याचे ट्विट राजनाथ सिंह यांनी केले आहे.

  • Excellent meeting with the Russian Defence Minister General Sergey Shoigu in Moscow today. We talked about a wide range of issues, particularly how to deepen defence and strategic cooperation between both the countries.

    — Rajnath Singh (@rajnathsingh) September 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

गुरुवारी रशियाच्या संरक्षण मंत्र्याशी बैठक झाल्याची माहिती सिंह यांनी दिली होती. देशाच्या सुरक्षेसाठी रशियाने केलेल्या सहकार्याचे सिंह यांनी कौतुक केले. तसेच भारत रशिया करारानुसार लष्करी सामुग्री जलद भारताला देण्याच्या मुद्द्यावर त्यांनी जोर दिला. एके ४७ २०३ या बंदुका बनविण्यासाठी रशिया आणि भारतात नुकताच करार झाला आहे.

दरम्यान, रशिया आणि भारताच्या नौदलाने बंगालच्या उपसागरात चार आणि पाच सप्टेंबर दरम्यान लष्करी सराव आयोजित केला आहे. या सरावाचा आज पहिला दिवस होता. दोन्ही देशामधील सरावाचे हे ११ वे वर्ष आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.