ETV Bharat / bharat

येस बँकेवरील निर्बंधांचा देवालाही फटका; ओडिशामधील जगन्नाथ देवस्थानाचे ५४५ कोटी अडकले.. - येस बँक बंदी

आरबीआयने दिलेल्या निर्देशांनुसार, गुरुवारपासून येस बँकेवर निर्बंध लादण्यात आले. बँकेवर असणाऱ्या कर्जाच्या बोजामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आरबीआयने दिली. सामान्य नागरिकांसह चक्क देवालाही यामुळे फटका बसला आहे. ओडिशाच्या पुरी शहरामधील जगन्नाथ देवस्थानाच्या नावाने बँकेत तब्बल ५४५ कोटी रूपये अडकले आहेत.

Odisha: Lord Jagannath's Rs 545 Cr stuck in Yes Bank
येस बँकेवरील निर्बंधांचा देवालाही फटका; ओडिशामधील जगन्नाथ देवस्थानाचे ५४५ कोटी अडकले..
author img

By

Published : Mar 6, 2020, 8:04 PM IST

भुवनेश्वर - येस बँक या खासगी बँकेवर आरबीआयने निर्बंध लादल्यामुळे सामान्यांना तर त्रास सहन करावाच लागत आहेच; मात्र चक्क देवालाही यामुळे फटका बसला आहे. ओडिशाच्या पुरी शहरामधील जगन्नाथ देवस्थानाच्या नावाने बँकेत तब्बल ५४५ कोटी रूपये अडकले आहेत.

आरबीआयने दिलेल्या निर्देशांनुसार, गुरुवारपासून येस बँकेवर निर्बंध लादण्यात आले. बँकेवर असणाऱ्या कर्जाच्या बोजामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आरबीआयने दिली. या निर्बंधांनुसार, या बँकेच्या खातेदारांना केवळ ५० हजारांपर्यंतची रक्कम आपल्या खात्यातून काढता येणार आहे. एका महिन्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

आरबीआयच्या या निर्णयामुळे देवस्थानच्या भाविकांमध्ये दहशत पसरली आहे, असे मत मंदिराचे 'दैत्यपती' (सेवक) विनायक दासमोहापात्रा यांनी व्यक्त केले. यासोबतच, थोड्याश्या व्याजासाठी एवढी मोठी रक्कम एका खासगी बँकेत ठेवणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

देवस्थानाची रक्कम एका खासगी बँकेत ठेवणे हे बेकायदेशीर, तसेच अनैतिक आहे. श्री जगन्नाथ मंदिर प्रशासन (एसजेटीए) आणि मंदिराच्या व्यवस्थापकीय समितीला या अनिश्चिततेसाठी जबाबदार धरले पाहिजे, असे जगन्नाथ सेनेचे संयोजक प्रियदर्शी पटनायक यांनी सांगितले. याआधी हे पैसे खासगी बँकेत ठेवल्यावरून पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती, मात्र त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असेही त्यांनी सांगितले.

याबाबत माहिती देताना, राज्याचे कायदेमंत्री प्रताप जेना यांनी सांगितले, की बँकेत ठेवण्यात आलेला देवस्थानाचा पैसा हा बचत खात्यात नाही, तर फिक्स डिपॉझिटमध्ये आहे. सरकारने येस बँकेमधील फंड हे राष्ट्रीयकृत बँकेत हलवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, आरबीआयने येस बँकेच्या खातेदारांना ही हमी दिली आहे, की त्यांचे पैसे हे खात्यामध्ये सुरक्षित आहेत. या निर्णयानंतर खातेदारांनी आपापल्या खात्यामधील पैसे काढण्यासाठी एटीएमबाहेर रांगा लावल्या होत्या. बँकेने याआधी कोणतीही सूचना न दिल्यामुळे, तसेच एटीएममध्येही पैसे उपलब्ध नसल्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोष पसरला आहे.

हेही वाचा : 'येस बँकेत आर्थिक अनियमितता आणि प्रशासकीय हलगर्जीपणा'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.