ETV Bharat / bharat

...म्हणून दिल्लीमध्ये पुन्हा लागू होणार सम विषम वाहन क्रमांक योजना

राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा सम आणि विषम नंबरच्या गाड्या धावण्याची योजना लागू करण्यात येणार आहे.

अरविंद केजरीवाल
author img

By

Published : Sep 13, 2019, 3:25 PM IST

नवी दिल्ली- राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा प्रदूषण समस्येमुळे सम विषम वाहन क्रमांक योजना लागू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबतची घोषणा केली आहे. मात्र, ही योजना फक्त दिवाळीनंतर ४ ते १५ नोव्हेंबर दरम्यान लागू असणार आहे. त्यानुसार दिल्लीमध्ये आता ६ दिवस सम क्रमांकाच्या आणि ६ दिवस विषम क्रमांकाच्या गाड्या रस्त्यावर धावणार आहेत.

सम गाड्यांना ठरवून दिलेल्या दिवशी विषम क्रमांकाच्या गाड्या चालवण्यास बंदी असेल. ४ नोव्हेंबरला सम क्रमांकाच्या गाड्या रस्त्यावर धावतील. जसे की - (२, ४, ६, ८, १०) तर ५ नोव्हेंबरला विषम क्रमांकाच्या गाड्यांना परवानगी असेल, जसे की - (३,५,७,९,११) या क्रमांकाच्या गाड्याच रस्त्यावर धावतील.

दिल्लीमध्ये प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या आधीही दिल्ली सरकारने सम विषम क्रमांकानुसार गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी शहरातील प्रदूषण कमी झाले होते, असे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले.

शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी या दिवाळीला फटाके न वाजवण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी जनतेला केले आहे. तसेच ऑक्टोबर महिन्यात म्हणजेच हिवाळ्यात लोकांना दिल्ली सरकार मास्क वाटणार आहे. हिवाळ्यामध्ये दिल्ली शहरावर धुक्याची चादर पांघरली जाते.

Intro:Body:

Bhopal boat accident

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.