ETV Bharat / bharat

भारतापुढील मोठी आरोग्य समस्या - लठ्ठपणा... - शिफालिका गोएंका लठ्ठपणा लेख

सध्या जगभरात कोरोना थैमान घालत आहे. याचा लठ्ठपणाशी काय संबंध आहे? कोरोनासारख्या विषाणूला लठ्ठपणा कसा चालना देत आहे? लिहित आहेत शिफालिका गोएंका. त्या शारिरीक व्यायाम आणि लठ्ठपणा रोखण्याच्या विषयात संशोधन करत असून भारतीय सार्वजनिक आरोग्य प्रतिष्ठानच्या तज्ञ आणि प्राध्यापक आहेत. यातील मते त्यांची वैयक्तिक आहेत.

Obesity in India: a major health concern
भारतापुढील मोठी आरोग्य समस्या - लठ्ठपणा...
author img

By

Published : Mar 31, 2020, 7:18 PM IST

४ मार्चला आपण जागतिक स्थूलपणा दिवस साजरा केला. भारत सरकारने केलेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य पहाणी-४ नुसार, बहुतेक राज्यांत शहरी आणि ग्रामीण भागात लठ्ठपणा गेल्या दहा वर्षांत दुप्पट वाढला आहे. उदाहरणार्थ गोव्यात पुरूषांमध्ये लठ्ठपणा १५ टक्क्यांवरून ३२ टक्के, तामिळनाडूत १५ वरून २८ टक्के, गुजरातमध्ये ११ वरून २० टक्के, हरियाणात १० टक्क्यांवरून २० टक्के आणि अगदी बिहारमध्येही ६ टक्क्यांवरून १२ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. महिलांमध्येही, आंध्रप्रदेशात तो १७ टक्क्यांवरून ३३ टक्के, अरूणाचल प्रदेशात ८ वरून १८ टक्के, मणिपूरमध्ये १३ टक्क्यांवरून २६ टक्के, हिमाचलप्रदेशात १३ वरून २८ टक्के अशाच पद्घतीने लठ्ठपणा वाढला आहे.

भारतात, लठ्ठपणात नुकसान करण्याची क्षमता अधिकच आहे. आपल्याला सर्वांना माहित आहे की, आपण मधुमेहाशी युद्घ पुकारले आहे. भारतात मधुमेहासाठी लठ्ठपणा हाच सर्वाधिक महत्वाचा जोखमीचा घटक आहे. २०१६ मध्ये भारतात प्रत्येक १०० लठ्ठ प्रौढांमागे(वय २० पेक्षा जास्त) मधुमेह असलेले ३८ प्रौढ होते आणि जागतिक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण १९ आहे. २५ च्यावर बीएमआय(बॉडी मास इंडेक्स) हा लठ्ठ गृहित धरला जातो, खूप मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या छुपी लठ्ठ आहे. याचा अर्थ, उघडपणे ते लठ्ठ नसतात पण शरीरात फॅट्सचे प्रमाण उच्च असते आणि पोटाभोवती मोठी चरबी साठलेली असते. पुरूषांमध्ये कंबरेचा घेर ९० सेंमी. पेक्षा जास्त आणि महिलांमध्ये तो ८० सेंमी. पेक्षा जास्त असेल तर तो उदराभोवताचा लठ्ठपणा समजला जातो. त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब,उच्च कोलेस्टेरॉल आणि ह्रदयविकार आणि ह्रदयविकाराचा धक्का यांची जोखिम तो महत्वपूर्णरित्या वाढवतो.

सध्याच्या कोविड-१९ विषाणुबाबत याची समानता आपण पाहू या. कोविड-१९ विषाणुला रोखण्यासाठी परिवहन व्यवस्था, आर्थिक, सामाजिक आणि खाद्यपदार्थ व्यवस्था मोठी भूमिका बजावतात. याव्यतिरिक्त आपल्याला माहित आहे की नष्ट होत चाललेली जंगले आणि मानवांचे प्राण्यांशी वाढणारे सान्निध्य हे त्याचे मूळ म्हणून कोविड-१९ आणि सार्स या प्राणिजन्य विषाणुंच्या मूळ म्हणून भूमिका बजावली आहे. आपण त्यासाठी कोणत्याही व्यक्तीला कधीही दोष देता कामा नये. लठ्ठपणासाठीही, व्यक्तींना दोष देणे थांबवा आणि परिवहन, आर्थिक आणि खाद्यपदार्थ प्रणालीमध्ये परिवर्तन घडवा, जे लठ्ठपणाचे मूळ आणि त्याला कायमस्वरूपी करणारे आहेत. स्मार्ट शहरे अगोदर लठ्ठपणाला रोखणारी हवीत. त्यांना प्रोत्साहन देणारी नकोत. एखाद्या शहरात लठ्ठपणाला रोखणार्या वैशिष्ट्यांमुळे लोकसंख्या कमी करण्याचा एक सहफायदाही होतो. (त्याअनुषंगाने, प्रत्येकाला हे माहित आहे की हवेतील प्रदूषण हे विशेषतः मुलांझधल्या लठ्ठपणासाठी जोखमीचा घटक आहे.) सर्वात महत्वाचे म्हणजे, वित्तीय,अन्नविषयक आणि कृषी धोरणे जी पोषक अन्नपदार्थ आणि पेये -ताजी फळे आणि भाज्या, डाळी, संपूर्ण धान्य, शेंगदाणे हा पर्याय प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्य़भर, रोजच्या जगण्यात, सर्व सामाजिक आर्थिक गटांमध्ये, स्वस्त आणि अधिक सहजसुलभ उपलब्ध असल्याने स्विकारण्याची गरज आहे. विशेषतः मुलांसाठी असलेल्या खराब अन्न आणि पेयांच्या विक्रीवर नियंत्रण मिळवणे हे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे सर्व नियोजनात शहरी जगले आणि शहरी कृषीचा समावेश अनिवार्य करावा का? लोकांमधील लठ्ठपणा रोखण्यासाठी दररोज शारिरीक व्यायाम अत्यंत मोठी भूमिका बजावतो. आपण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फिट इंडिया चळवळ सुरू केल्याबद्दल टाळ्या वाजवून कौतुक करतो. फिटनेस असे पर्यावरण पुरवण्याने साध्य करता येईल की जे अगदी योग्य पर्यावरण- योग्य शहरे, योग्य वाहतूक व्यवस्था-ज्यात योग्य पदपथ, योग्या करमणूक, योग्य शाळा आणि योग्य कामाची ठिकाणे तयार करू शकेल. भारतात तंदुरूस्तीला मेक इन इंडिया बनवले पाहिजे.

योग्य वाहतूक व्यवस्था यात अगदी योग्य पदपथ आणि रस्ते यांचा समावेश होतो. ६ इंचापेक्षा जास्त रूंद असलेल्या रस्त्यांइतके रूंद आणि उतरंडीसह पदपथ योग्य पदपथ असतात. रस्ते आणि पदपथांच्या दोन्ही बाजूंना हिरवागार वेलींचा मंडपाने नैसर्गिक वातानुकुलित यंत्र आणि प्राणवायुचे सिलिंडर म्हणून काम केले पाहिजे, जे मुले, महिला, तरूण आणि ज्येष्ठांना रणरणत्या उन्हात थंडावा देतील. तसेच, ठिकठिकाणी ठेवलेली बाकांसह आरामदायक चालणे, पिण्याच्या पाण्यासाठी कारंजी असली पाहिजेत. अगदी योग्य रस्त्यांसाठी शहरांत वाहनमार्ग मर्यादित म्हणजे १ ते २ असले पाहिजेत आणि त्यावर ठिकठिकाणी झेब्रा क्रॉसिंग असावे, सर्व वयातील लोकांसाठी पुरेशा वेळेची सिग्नल यंत्रणा आणि आरामदायकरित्या रस्ता ओलांडण्याची क्षमता हे अगदी योग्य रस्त्यांसाठी आणखी एक अत्यंत आवश्यक घटक आहे. मोटर वाहनमार्गांची संख्या १ ते २ असली तर ती पादचारी, त्यांची प्रतिष्ठा यासाठी असल्याचे ओळखले जाते आणि दिवसाचा बहुतेक वेळ लोकांना तसेच सायकलस्वारांना चालण्यासाठी आकर्षून घेते. ते समानता, नैतिकता आणि न्याय(आपण मल्टीलेन रस्त्यांना परवानगी दिलीच पाहिजे) यांना समर्थन देते. अगदी योग्य वाहतूक व्यवस्थेसाठी दर्जा, पुरेशी सार्वजनिक वाहतूक यांची आवश्यकता असून ती वापरकर्त्यांमध्ये तंदुरूस्ती वाढवण्यासाठी ओळखली जाते. सार्वजनिक वाहतूक चालण्याचा ट्रॅकचा वापर करणारे लोक दररोज ८ ते ३३ मिनिटांपर्यंत दररोज चालतात. अगदी योग्य करमणुकीसाठी शहरी जंगले/मोठ्या बागा ०.४ त्रिज्येच्या अंतर्गत असणे आवश्यक आहे आणि प्रत्येक व्यक्तीला लोकांना फिटनेसचा व्यायाम सुरू करून करमणूक करून घेण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि सर्व वयोगटातील लोकांमध्ये फिटनेससाठी जागृती आवश्यक आहे.

तंदुरूस्त इमारतींसाठी पुरेशी सजावट, हिरवाई, झाडे, कठडा असलेल्या रूंद आरामदायक जिन्यांवर जोर देणे, इतर आकर्षणांसह विद्युत व्यवस्था हा केंद्रबिंदू (इमारतीच्या मागील टोकाला असण्यापेक्षा) यांची आवश्यकता आहे. तंदुरूस्त सामाजिक निकषांनी चालणे आणि तंदुरूस्तीच्या उद्देश्याने केलेला पाठपुरावा सामाजिक दृष्ट्या इष्ट बनवला पाहिजे. भारतातील सर्व नगरे आणि गावांमध्ये संधी पुरवण्यासह कला आणि सांस्कृतिक केंद्रे आणि नृत्यशाळा सर्व वयोगटांसाठी तंदुरूस्ती आणि योग्य करमणुकीला चालना देतील. तंदुरूस्त शाळांना मोठे खेळाचे मैदान आणि सुविधा, नृत्याची सुविधा, शिक्षक आणि खेळ तसेच नृत्यात सहभाग घेण्यासाठी लाभांश तसेच अनिवार्य शारिरीक प्रशिक्षण आणि नृत्याचे वर्ग यांची गरज आहे. तंदुरूस्त कामाच्या ठिकाणांसाठी शारिरीक हालचालींना त्यांच्या अंतर्निहित पर्यावरण आणि धोरणांच्या माध्यमातून समर्थन दिले पाहिजे. तंदुरूस्ती वयाच्या बाबतीत संवेदनशील आणि मैत्रीपूर्ण इष्ट असण्याची गरज आहे. असे केल्याने आपल्याला खऱ्या अर्थाने विकसित आणि आमचा दृष्टिकोन आणि पाठपुराव्यात समन्यायी बनवेल.

- डॉ. शेफालिका गोएंका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.