बंगळुरु - विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या विरोधामुळे आणि हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या आरोपामुळे 'न्यूड वुईथ मंगळसूत्र' चित्रप्रदर्शन रद्द करण्यात आले आहे. चित्रकार सुजित कुमार जी. एस. मंड्या यांनी ही व्यक्तिचित्रे काढली आहेत. चित्रकला परिषद येथे २२ मार्च ते ३१ मार्चपर्यंत या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
'मंगळसूत्र हा हिंदू संस्कृतीतील पवित्र दागिना आहे. तसेच, असा दागिना विवाहितेने परिधान करणे ही केवळ हिंदू धर्मात असलेली परंपरा आहे. हिंदू धर्मात स्त्रीचा आदर केला जातो. तसेच, तिला मातेचा दर्जा दिला गेला आहे. तिला मंगळसूत्रासह विवस्त्र दाखवल्याने हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. आमचा कोणत्याही कलेला किंवा चित्रकार व्यक्तीला विरोध नाही. मात्र, त्यांनीही कलेच्या आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आमच्या भावना दुखावू नयेत,' असे या चित्रप्रदर्शनाला विरोध करणाऱ्या संघटनांचे म्हणणे आहे. याविषयी आयोजक आणि चित्रकाराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
हा वाद निर्माण झाल्यानंतर चित्रकार सुजित कुमार जी. एस. मंड्या यांनीही तिखट प्रतिक्रिया दिली आहे. 'माझी ६ वर्षांची कठोर मेहनत कोणीही फुकट घालवू शकत नाही. निवडणुकांनंतर लवकरच मी पुन्हा माझ्या चित्रांचे प्रदर्शन भरवेन. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे.' दरम्यान या चित्रकाराने आपल्याला हिंदुत्ववाद्यांकडून धमक्या आणि सोशल मीडियावर शिविगाळ करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. तसेच, याविषयी पोलिसात तक्रार दाखल करून सुरक्षेची मागणी केली आहे.
हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या आरोपामुळे 'न्यूड वुईथ मंगळसूत्र' चित्रप्रदर्शन रद्द
'आमचा कोणत्याही कलेला किंवा चित्रकार व्यक्तीला विरोध नाही. मात्र, त्यांनीही कलेच्या आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आमच्या भावना दुखावू नयेत,' असे या चित्रप्रदर्शनाला विरोध करणाऱ्या संघटनांचे म्हणणे आहे.

Conclusion: