पंचकुला (हरियाणा) - एनएसयूआयकडून वृत्तनिवेदक अर्नब गोस्वामी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. एनएसयूआयचे म्हणणे आहे की, अर्नब गोस्वामी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना लक्ष्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे, धार्मिक वातावरण बिघडवण्याचे काम करत आहेत.
पालघर येथील संतांची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित न्यूज कार्यक्रमात बोलताना गोस्वामी यांनी सोनिया गांधींवर टीका केली होती. याप्रकरणी एनएसयूआय नेते दिपांशू बंसल यांनी डीजीपी हरियाणा पोलीस, पंचकुला पोलीस उपायुक्त आणि सहायक एसीपी पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे. गोस्वामी यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या प्रकारचे निवेदक राष्ट्रीय न्यूज चॅनेलद्वारे असे भडकाऊ वक्तव्य करत असतील तर ते देशहितासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्याची गरज असल्याचे बंसल म्हणाले.