गुवाहाटी - आसाममध्ये राष्ट्रीय नागरिकत्त्व नोंदणीची अंतिम यादी जाहीर झाली आहे. भारतीय नागरिकत्त्वाच्या यादीमध्ये ३ कोटी ११ लाख २१ हजार ४ लोकांचा समावेश करण्यात आला आहे. तर १९ लाख ६ हजार ६५७ लोकांना यातून वगळण्यात आले आहे. ज्या लोकांचा या यादीमध्ये समावेश झाला नाही, त्यांना नागरिकत्त्व सिद्ध करण्याची संधी देण्यात येणार आहे, असे प्रशासनाने म्हटले आहे. राष्ट्रीय नागरिकत्त्व नोंदणी अधिकारी प्रतिक हजेला यांनी या बाबतची माहिती दिली.
-
Prateek Hajela,State Coordinator,NRC: A total of 3,11,21,004 persons found eligible for inclusion in final NRC leaving out 19,06,657 persons including those who did not submit their claims.Those not satisfied with outcome can file appeal before Foreigners Tribunals. (file pic) https://t.co/HfgIsjZ6lr https://t.co/A73ATaijTC
— ANI (@ANI) August 31, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Prateek Hajela,State Coordinator,NRC: A total of 3,11,21,004 persons found eligible for inclusion in final NRC leaving out 19,06,657 persons including those who did not submit their claims.Those not satisfied with outcome can file appeal before Foreigners Tribunals. (file pic) https://t.co/HfgIsjZ6lr https://t.co/A73ATaijTC
— ANI (@ANI) August 31, 2019Prateek Hajela,State Coordinator,NRC: A total of 3,11,21,004 persons found eligible for inclusion in final NRC leaving out 19,06,657 persons including those who did not submit their claims.Those not satisfied with outcome can file appeal before Foreigners Tribunals. (file pic) https://t.co/HfgIsjZ6lr https://t.co/A73ATaijTC
— ANI (@ANI) August 31, 2019
जे लोक या यादीतून वगळले गेले असतील त्यांना परदेशी नागरिक लवादात दाद मागण्याची संधी देण्यात येणार आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या ५१ तुकड्या राज्यामध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. तर मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी जनतेला घाबरुन न जाण्याचे आवाहन केले आहे.
ज्या लोकांची नावे यादीमध्ये नाहीत त्यांनी घाबरुन जाण्यीची गरज नाही. भारतीय नागरिक आहोत, हे सिद्ध करण्यासाची यादीत नाव नसणाऱ्यांना संधी दिली जाईल, तसेच कायदेशीर प्रक्रियेनंतरच यावर निर्णय घेतला जाईल त्यामुळे घाबरून जाऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री सोनोवाल यांनी जनतेला केले आहे.
हेही वाचा - आसाममध्ये कार आणि बसच्या अपघातात ४ वन कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू
अनेक बांग्लादेशी नागरिक अनधिकृत स्थलांतर करुन भारतामध्ये आले आहेत. नागरिकत्त्व यादीमुळे भारताचे अधिकृत नागरिक कोण आणि परदेशी स्थलांतरीत कोण हे समजणार आहे.
हेही वाचा - रस्त्यावर थुंकल्याने युवकाला काढायला लावल्या उठाबशा
nrcassam.nic.in या संकेतस्थळावर नागरिकांना ही यादी पाहता येणार आहे. मागील वर्षी सकराने राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीचा मसुदा जाहीर केला होता. ३.९ कोटी अर्जदारांपैकी २.९ अर्जदारांचाच यादीमध्ये समावेश करण्यात आला होते. ४० लाख लोकांना या यादीतून वगळण्यात आले होते. त्यामुळे आसममध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. नाव यादीत नसलेल्या ३६ लाख लोकांनी आपले नाव यादीत समाविष्ट व्हावे म्हणून अर्ज केला होता.
हेही वाचा - काश्मीरमध्ये राहत असलेल्या आजारी सासू-सासऱ्यांशी २२ दिवसांपासून संपर्क नाही - उर्मिला मातोंडकर
कोणतीही अफवा पसरु नये म्हणून आम्ही काळजी घेत आहोत. कोणी अफवा पसरवत असेल तर त्यावर तत्काळ कारवाई करण्यात येईल, असे आसामचे पोलीस महासंचालकांनी सांगितले आहे. समाजमाध्यमांद्वारे लोकांना जागरुक करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.