ETV Bharat / bharat

एस.एस. कल्पना चावला : नॉरथ्रॉप ग्रुपच्या नव्या स्पेसक्राफ्टला भारतीय वंशाच्या अंतराळवीराचे नाव - कल्पना चावला स्पेसक्राफ्ट

प्रत्येक सायग्नस एअरक्राफ्टला अंतराळ संशोधनामध्ये मोलाची कामगिरी बजावणाऱ्या एका व्यक्तीचे नाव देण्याची कंपनीची परंपरा आहे. भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीर म्हणून चावला यांचे काम अनन्यासाधारण आहे. त्यामुळेच त्यांचे नाव या स्पेसक्राफ्टला देण्यात आले आहे, असे कंपनीने स्पष्ट केले.

Northrop Grumman Corporation named next Cygnus spacecraft in honour of astronaut Kalpana Chawla
एस.एस. कल्पना चावला : नॉरथ्रॉप ग्रुपच्या नव्या स्पेसक्राफ्टला भारतीय वंशाच्या अंतराळवीराचे नाव
author img

By

Published : Sep 9, 2020, 6:33 AM IST

वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवण्यात येणाऱ्या पुढील सायग्नस स्पेसक्राफ्टला भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव देण्यात आले आहे. नॉरथ्रॉप ग्रुम्मन कंपनीचे हे स्पेसक्राफ्ट आहे. मंगळवारी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली.

"नॉरथ्रॉप ग्रुप अभिमानाने घोषित करत आहे, की एनजी-१४ सायग्नस स्पेसक्राफ्टला दिवंगत अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव देण्यात आले आहे. प्रत्येक सायग्नस एअरक्राफ्टला अंतराळ संशोधनामध्ये मोलाची कामगिरी बजावणाऱ्या एका व्यक्तीचे नाव देण्याची कंपनीची परंपरा आहे. भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीर म्हणून चावला यांचे काम अनन्यासाधारण आहे. त्यामुळेच त्यांचे नाव या स्पेसक्राफ्टला देण्यात आले आहे." असे कंपनीने स्पष्ट केले.

'एस.एस. कल्पना चावला' नावाचे हे स्पेसक्राफ्ट २९ सप्टेंबरला प्रक्षेपित केले जाणार आहे. ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अत्यावश्यक सामान घेऊन जाईल. नासाच्या वॉलोप्स फ्लाईट फॅसिलिटीवरून याचे प्रक्षेपण होईल. तसेच, 'व्हर्जिनिया स्पेस'च्या मिड-अ‌ॅटलांटिक स्पेसपोर्ट (एमएआरएस)मधून याला कक्षेमध्ये सोडण्यात येईल. साधारणपणे साडेतीन हजार किलोचे अत्यावश्यक सामान या स्पेसक्राफ्टमधून पाठवण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.