ETV Bharat / bharat

उन्नाव बलात्कार प्रकरण: पीडितेच्या अपघातप्रकरणी कुलदीप सेनगरवर हत्येचा आरोप नाही

उन्नाव बलात्कार पीडितेच्या अपघातप्रकरणी सीबीआयने लखनऊ न्यायालयामध्ये शुक्रवारी आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात निलंबित भाजप आमदार कुलदिप सेनगर यांच्यावर हत्येचा आरोप लावण्यात आला नाही.

कुलदीप सेनगर
author img

By

Published : Oct 12, 2019, 7:18 PM IST

लखनऊ - उन्नाव बलात्कार पीडितेच्या अपघात प्रकरणी सीबीआयने लखनऊ न्यायालयामध्ये शुक्रवारी आरोपपत्र दाखल केले. मात्र, या आरोपपत्रातून भाजपचे निलंबित आमदार कुलदीप सेनगर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरील हत्येचे कलम रद्द करण्यात आले आहे. संगनमताने गुन्हा करणे आणि धमकावने या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उन्नाव बलात्कार खटल्यातील पीडित तरुणी नातेवाईकांसह तुरुंगात असलेल्या काकांना भेटायला जात असताना २८ जुलैला त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. या अपघातामध्ये पीडितेसह तिचे वकील गंभीर जखमी झाले होते. तर दोन नातेवाईकांचा मृत्यू झाला होता. हा अपघात नसून घातपात असल्याच्या शक्येतेने सीबीआय पथक तपास करत होते.

या खटल्यात सीबीआयने कुलदीप सेनगर त्यांचा ड्रायव्हर आणि इतर सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, यामध्ये सेनगर आणि सहकाऱ्यांवर हत्येच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला नाही. सेनगर यांच्या गाडीचा ड्रायव्हर आशिष कुमार पाल याच्यावर भारतीय दंडविधान नुसार ३०४- ए, ३३८ आणि २७९ कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तर सेनगर आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांवर कलम १२० नुसार गुन्हा दाखल केला झाला आहे.

पीडितेच्या गाडीचा अपघात झाल्यानंतर कुटुंबीयांनी या अपघातामागे कुलदीप सेनगरचा हात असल्याचा आरोप केला होता. जखमी अवस्थेत पीडितेला दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २५ सप्टेंबरला तिला रुग्णालयातून सोडण्यात आले होते. तसचे कुटुंबीयांच्या मागणीनुसार पीडितेच्या कुटुंबीयांची दिल्लीमध्ये राहण्याची व्यवस्था केली होते.

Intro:Body:

national marathi

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.