ETV Bharat / bharat

लॉकडाऊन इफेक्ट : नियम मोडणाऱ्यांच्या वाहनांवर लाल रंग, इंधन न देण्याचे पेट्रेल पंपांना आदेश - संचारबंदी इफेक्ट

लॉकडाऊनचे उल्लंघन करणार्‍यांवर श्रीक्काकुलम पोलीस कडक कारवाई करण्यासोबतच आणखी एक उपाययोजना केली आहे. शटडाऊन नियमांचे उल्लंघन करणारी वाहने पोलीस पथकाने लाल रंगाच्या पेंटने रंगवली असून लाल रंगाने रंगविलेल्या वाहनांना पेट्रोल, डिझेल देण्यात येऊ नये असे निर्देश पेट्रल पंप मालकांना देण्यात आले आहेत.

नियम मोडणाऱ्यांच्या वाहनांवर लाल रंग
नियम मोडणाऱ्यांच्या वाहनांवर लाल रंग
author img

By

Published : Apr 20, 2020, 11:51 AM IST

श्रीक्काकुलम - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, तरीही काही मुजोर नागरिक नियमांचे उल्लंघन करून विनाकारण घराबाहेर पडत आहेत. अशा नागिरांकावर कडक कारवाई केली जात असूनही यांचे प्रमाण कमी होत नसल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशच्या श्रीक्काकुलम पोलिसांनी लोकांना जागरुक करण्यासाठी एक उपाययोजना केली आहे.

श्रीकाकुलममध्ये पोलिसांनी लॉकडाउन उल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दिशेने पहिले पाऊल म्हणून, शटडाऊन नियमांचे उल्लंघन करणारी वाहने पोलीस पथकाने लाल रंगाने रंगवली आहेत. तसेच ज्यांच्या वाहनांवर लाल रंगाचा रंग लावण्यात आला आहे, अशा वाहनांना पेट्रोल, डिझेल देण्यात येऊ नये, असे आदेश पेट्रोल पंप मालकांना देण्यात आले आहेत. या योजनेमुळे तरी नागरिक घराबाहेर पडणार नाहीत, अशी पोलीस आशा करत आहे.

यासोबतच, लॉकडाउन नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना पोलीस समुपदेशनही देत ​​आहेत. तर, नागरिकांना सकाळी 6 ते 11 या वेळेत जीवनावश्यक साहित्य खरेदी करण्याची परवानगी असून त्याच वेळेत त्यांनी सर्व साहित्य घेऊन नंतर घरातच राहून सहकार्य करावे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.