नवी दिल्ली - १५ एप्रिलनंतर रेल्वे सेवा सुरू होण्याबद्दल समाजमाध्यमांमध्ये काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. मात्र आता रेल्वे मंत्रालयाने स्वतःच ही गोष्ट स्पष्ट केली आहे, की रेल्वेचा असा काही विचार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये २१ दिवसांसाठी लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. १५ एप्रिलला ही मुदत संपणार आहे.
त्यामुळेच, १५ एप्रिलपासून रेल्वे सेवा पूर्ववत होणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. मात्र, रेल्वे मंत्रालयाने या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. सध्या रेल्वे मंत्रालयाने याबाबत कोणताही विचार केला नसल्याचे सांगत, योग्य वेळी रेल्वे मंत्रालयाकडून नागरिकांच्या हितासाठी योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील सर्व प्रवासी वाहतूक थांबवण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवा आणि मालवाहतूक सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक परराज्यांमध्ये अडकले आहेत. मोठ्या प्रमाणात लोक वाहतूक सुरू होण्याची वाट पाहत आहेत.
हेही वाचा : कर्नाटकातील १,३०० लोकांनी लावली होती मरकजला हजेरी; मुख्यमंत्र्यांची माहिती..