ETV Bharat / bharat

निझामुद्दीन मरकझ : दिल्ली न्यायालयाकडून 122 मलेशियन नागरिकांना जामिन मंजूर - तबलिगी मरकझ

दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकझमध्ये मार्च महिन्यात धार्मिक कार्यक्रम पार पडला होता. यात सहभागी झालेल्या 122 मलेशियन नागरिकांचा जामिन दिल्ली न्यायालयाने मंजूर केला आहे.

निझामुद्दीन मरकझ
निझामुद्दीन मरकझ
author img

By

Published : Jul 8, 2020, 10:15 AM IST

नवी दिल्ली - दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकझमध्ये मार्च महिन्यात धार्मिक कार्यक्रम पार पडला होता. यात सहभागी झालेल्या 35 देशांतील परदेशी नागरिकांनी व्हिसा शर्तीचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. आज दिल्ली न्यायालयाने 122 मलेशियन नागरिकांचा जामिन अर्ज मंजूर केला आहे.

मुख्य महानगर दंडाधिकारी गुरमोहिना कौर यांनी 10 हजार रुपयांचे वैयक्तिक बंधपत्र देऊन परदेशी लोकांना अटकेपासून संरक्षण दिले. सुनावणी दरम्यान, हॉटेलमध्ये थांबलेल्या सर्व परदेशीयांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. तसेच त्यांची पुष्टी मलेशियन उच्चायोगाच्या अधिकाऱ्यांनी केली.

पर्यटनाच्या नावाखाली व्हिसा घेऊन दिल्लीच्या निजामुद्दीन भागात तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या 960 विदेशी नागरिकांना भारताने 3 एप्रिलला काळ्या यादीत टाकले होते. तसेच त्यांचा भारतीय व्हिसाही रद्द करण्यात आला आहे. व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

दिल्लीतील निजामुद्दीन येथे 'मरकज' हा धार्मिक प्रार्थनेचा कार्यक्रम 13 मार्च ते 15 मार्चदरम्यान आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शेकडो लोक सहभागी झाले होते. यातील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. अनेकांचा मृत्यू झाला आहे. कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेल्या तबलिगी जमातीच्या सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याने संक्रमित लोकांची संख्या झपाट्याने वाढली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.