नवी दिल्ली - मानव संसांधन विकास मंत्रालयाच्या 'नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिग फ्रेमवर्क' च्या क्रमवारीनुसार आयआयटी मद्रास, आयआयएस बेंगळूरु आणि आयआयटी दिल्लीने पहिल्या तीन स्थानी येण्याचा बहुमान मिळवला आहे. देशातील सर्व शैक्षणिक संस्थांमधून ही क्रमवारी काढण्यात येते.
प्रथम तीन विद्यापीठांमध्ये इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स बंगळुरु, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठाने अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे.
आयआयएम अहमदाबाद हे देशातील प्रथम क्रमांकाचे बिझनेस स्कूल ठरले. तर त्याखाली आयआयएम बंगळुरुने दुसरा आणि आयआयएम कोलकाताने तिसरा क्रमांक पटकावला आहे. मानव संसाधन मंत्री रमेश पोखरियाल यांनी ही नावे जाहीर केली. महाविद्यालयांच्या क्रमवारीत मिरांडा महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. तर त्याखालोखाल लेडी श्रीराम कॉलेज फॉर वुमन आणि सेंट स्टिफन्स कॉलेज यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला.
देशातली अग्रगन्य अभियांत्रिकी महाविदयालयाच्या यादीत आयआयटी मद्रासने पहिला, आयआयटी दिल्लीने दुसरा तर आयआयटी मुंबईने तिसरा क्रमांक पटकावला.
फार्मसी महाविद्यालयांमध्ये जामिया हमदर्द इन्स्टिट्युटने पहिला क्रमांक पटकावला, तर पंजाब विद्यापीठ, चंदिगड दुसऱ्या क्रमांकावर आहे. नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फार्मास्युटिकल ऑफ सिसर्च मोहाली हे तिसऱ्या क्रमांकावर आले.
वैद्यकीय महाविद्यालयांच्या क्रमवारीत दिल्ली एम्स महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला तर पीजीआय चंदीगड दुसऱ्या क्रमांकावर असून सीएमसी वेल्लोर महाविद्यालय तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोरोनामुळे ही क्रमवारी जाहीर करण्यास उशिर झाला. अन्यथा एप्रिल महिन्यातच क्रमवारी जाहीर करण्यात येते.