ETV Bharat / bharat

निर्भया प्रकरणी धक्कादायक खुलासा! त्या क्रुर रात्रीची कहानी सांगण्यासाठी मित्रानेच उकळले लाखो रुपये - Senior journalist Ajit Anjum on Nirbhaya gangrape,

२०१२ संपूर्ण देशभरात महिला अत्याचाराविरुद्ध संतापाची लाट पसरवणारे निर्भया प्रकरण २०१२ मध्ये डिसेंबर महिन्यात घडले होते. याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

निर्भया प्रकरणी धक्कादायक खुलासा
author img

By

Published : Oct 13, 2019, 6:32 PM IST

नवी दिल्ली - संपूर्ण देशभरात महिला अत्याचाराविरुद्ध संतापाची लाट पसरवणारे निर्भया प्रकरण २०१२ मध्ये डिसेंबर महिन्यात घडले होते. याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. घटनास्थळी निर्भयासोबत असलेला तिच्या मित्राने वृत्तवाहिन्यांना मुलाखती देण्याच्या बदल्यात लाखो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • #Netflix पर देर रात तक #DelhiCrime देखकर विचलित होता रहा.निर्भया रेप कांड पर है ये सीरीज.मुझे याद आ गया निर्भया को वो दोस्त,जो उस गैंगरेप के वक्त उसके साथ बस में था.जो अपनी दोस्त के साथ हुई दरिंदगी का गवाह था.उसके बारे में आज वो सच बताने जा रहा हूं जो आज तक छिपा रखा था.
    (1/10)

    — Ajit Anjum (@ajitanjum) October 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

इंडिया टीव्ही आणि न्यूज २४ या वाहिन्यांचे माजी व्यवस्थापकीय संचालक अजित अंजुम यांनी या संदर्भातले ट्विट करत धक्कादायक माहिती दिली आहे.

वरिष्ठ पत्रकार अजित अंजुम यांनी याप्रकरणी खुलासा केला आहे. निर्भया प्रकरणावर बनलेली नेटफ्लिक्सवरची वेबसिरिज दिल्ली क्राईम पाहिल्यानंतर त्यांनी ह्या प्रकरणी सार्वजनिकरित्या लिहले आहे. 'ज्या मुलाच्या मैत्रिणीसोबत इतका वाईट प्रकार घडला. त्या घटनेविषयी सांगून हा मुलगा वृत्तवाहिन्याकडून लाखो रुपये कमवत आहे. मी कधीच त्या मुलाच्या डोळ्यात दु:ख पाहिले नाही', असे अजित यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

ज्यावेळी त्याची आमच्या चॅनलमध्ये मुलाखत होती. तेव्हा तो पैसै घेऊन मुलाखत देतो अशी माहिती आम्हाला मिळाली. तो आल्यानंतर त्याला आम्ही ७० हजार रुपये दिले. हा सर्व प्रकार आम्ही गुप्त कॅमेऱ्याने रेकॉर्ड केला. मुलाखती दरम्यान त्याला आम्ही पैसै घेण्याबद्दल विचारल्यानंतर तो भेदरला. त्यानंतर तो माफी मागायला लागला. जर तु पैसै घेऊन निर्भयासोबत काय घडले हे विकणार असशील तर आम्ही तुझा पर्दाफाश करू, अशी ताकीद मी त्याला दिली. त्यानंतर अनेक वर्षे तो दिसलाच नाही.

ज्यावेळी स्टुडिओमध्ये हा सर्व प्रकार झाला. तोपर्यंत न्युजरुम मधील खालच्या मजल्यापासून तर तळमजल्यापर्यंत सर्व जण जमा झाले होते. त्यावेळी सगळे रागात होते. या सर्व प्रकाराचे आपण वाहिनीवर थेट प्रक्षेपण करावे, असे सगळ्याचे म्हणणे होते. मात्र, या सर्वांचा वापर आरोपी पक्ष न्यायालयात करेल. म्हणून मी हे प्रकरण प्रक्षेपित न करण्याचे ठरवले.

Nirbhaya gangrape: Victim's friend made money off interviews, says Senior journalist Ajit Anjum
निर्भया प्रकरणी धक्कादायक खुलासा! त्या क्रुर रात्रीची कहानी सांगण्यासाठी मित्रानेच उकळले लाखो रुपये

दिल्लीमधील ती काळी रात्र...

१६ डिसेंबर २०१२ च्या रात्री दक्षिण दिल्लीतील वसंत विहार भागात सहा नराधमांनी ‘निर्भया’वर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला होता. ‘निर्भया’चा सिंगापूरच्या हॉस्पिटलमध्ये २९ डिसेंबर २०१२ ला मृत्यू झाला होता. दिल्ली व भारतातील इतर ठिकाणी अनेक मोर्चे काढले गेले व निषेध नोंदवला गेला. ५ मे २०१७ ला याप्रकरणी चारही आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.