ETV Bharat / bharat

निर्भया प्रकरण : दोषी अक्षय ठाकूरने दाखल केली दया याचिका - दोषी अक्षय ठाकूरची दया याचिका

निर्भया प्रकरणातील दोषी आपली फाशीची शिक्षा लांबवण्यासाठी रोज नवे पर्याय शोधत आहेत. दोषी अक्षय ठाकुरने पुन्हा एकदा दया याचिका दाखल केली आहे.

निर्भया प्रकरण
निर्भया प्रकरण
author img

By

Published : Feb 29, 2020, 5:15 PM IST

नवी दिल्ली - निर्भया प्रकरणातील दोषी आपली फाशीची शिक्षा लांबवण्यासाठी रोज नवे पर्याय शोधत आहेत. दोषी अक्षय ठाकुरने पुन्हा एकदा दया याचिका दाखल केली आहे. फेटाळण्यात आलेल्या पहिल्या याचिकेमध्ये संपूर्ण तथ्य नव्हते, असे त्याने याचिकेमध्ये म्हटले आहे.

  • 2012 Delhi gangrape case: One of the convicts, Akshay has moved mercy petition claiming that his earlier petition that was dismissed did not have all the facts. pic.twitter.com/RArzA5mUjZ

    — ANI (@ANI) February 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दोषी अक्षय ठाकुरने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दया याचिका दाखल केली होती. त्यांची याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली होती. त्यावर आज पुन्हा त्याच्याकडून दया याचिका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान दोषी पवन कुमारच्या 'क्युरेटिव' याचिकेवर न्यायालयात 2 मार्चला सुनावणी होणार आहे. निर्भया प्रकरणातील चौथा आरोपी असलेल्या पवन कुमार 28 फेब्रुवरीला सर्वोच्च न्यायालयात 'क्युरेटिव' याचिका दाखल केली होती.

निर्भया प्रकरणातील दोषींना तीन मार्चला सकाळी सहा वाजता फाशी देण्यात येणार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने 2012 मध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या खटल्यासंदर्भात तारीख जाहीर केली आहे. या आधी तीन वेळा संबंधित प्रकरणातील दोषींच्या फाशीची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.

डिसेंबर 2012 मध्ये 23 वर्षीय तरुणीवर बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. यामध्ये उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुकेश, पवन गुप्ता, विनय कुमार शर्मा आणि अक्षय ठाकूर या दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. यापूर्वी 11 मार्च 2013 मध्ये या प्रकरणातील मुख्य आरोपी राम सिंहने तिहार तुरुंगात आत्महत्या केली होती.

हेही वाचा - निर्भया प्रकरण : दोषी पवन कुमार गुप्ताने दाखल केली 'क्युरेटिव' याचिका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.