ETV Bharat / bharat

पुलवामा हल्ला : आत्मघाती हल्लेखोराला मदत करणाऱ्या शाकीर बाशीरला अटक, एनआयएची कारवाई - अदील अहमद डार

पुलवामा हल्ल्याचा तपास करत असलेल्या एनआयएच्या पथकाने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा सदस्य शाकीर बाशीर याला अटक केली आहे.

पुलवामा हल्ला
पुलवामा हल्ला
author img

By

Published : Feb 28, 2020, 10:48 PM IST

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) एका तुकडीवर आत्मघातकी दहशतवादी हल्ला झाला होता. हल्ल्याचा तपास करत असलेल्या एनआयएच्या पथकाने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा सदस्य शाकीर बाशीर याला अटक केली आहे.

जवानांच्या तुकडीवर आत्मघाती हल्ला करणारा अदील अहमद डारला राहण्यासाठी शाकीर बाशीरने जागा उपलब्ध करुन दिली होती. तसेच पाकिस्तानी दहशतवादी उमर फारूकला 2018 वर्षांच्या अखेर पासून ते फेब्रुवरी 2019 पर्यंत राहण्यासाठी तसेच त्यांना स्फोटक तयार करण्यासाठी शाकीरने मदत केली होती. शाकीरला 15 दिवसांच्या कोठडीत पाठवले आहे.

14 फेब्रुवारी, 2019 ला पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान हुतात्मा झाले होते. सीआरपीएफ जवानांच्या ७८ गाड्यांचा ताफा जम्मूवरून श्रीनगरला जात होता. यावेळी पुलवामा जिल्ह्यातील लेथपोरा येथे जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेने आत्मघाती हल्ला केला.

हल्ला झाल्यानंतर जैश-ए-मोहम्मद संघटनेने त्याचा एक व्हिडिओ इंटरनेटवर टाकला होता. यामध्ये आत्मघाती हल्ला करणारा आदिल अहमद दार हा दहशतवादी होता. तो दक्षिण काश्मीरमधील गुंडिबाग येथे राहत होता. तसेच हल्ला झालेल्या ठिकाणापासून त्याचे घर अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर होते. तसेच हल्ल्याच्या काही वेळापूर्वी त्याने हा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचेही सांगितले जात होते. या व्हिडिओमध्ये त्याने १ वर्षापासून या हल्ल्याची तयारी सुरू असल्याचे कबुल केले होते.

हेही वाचा - महत्त्वाकांक्षी 'शांतता करार' स्वाक्षरी समारंभाला भारतही राहणार उपस्थित!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.