बंगळुरू : पाकिस्तानी दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन कर्नाटकच्या सिर्सी भागातून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ही कारवाई केली असून, सध्या या तरुणाची कसून चौकशी केली जात आहे.
सय्यद इद्रेस नबी सबा मुन्ना (२५) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. यापूर्वीही तीन वेळा एनआयएच्या पथकाने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता दहशतवादी कारवाईत सहभागी असल्याच्या संशयावरून मंगळवारी रात्री त्याच्या घरामधून त्याला अटक करण्यात आली आहे.
त्यानंतर बुधवारी त्याला न्यायालयासमोर उभे करण्यात आले. न्यायालयाची परवानगी मिळताच त्याला पश्चिम बंगालला नेण्यात आले असून, तेथे त्याची चौकशी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा : जोधपूरमध्ये निर्माणाधीन इमारतीची भिंत कोसळली, ९ जणांचा मृत्यू