ETV Bharat / bharat

#hyderabadEncounter: राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिले चौकशीचे आदेश - हैदराबाद बलात्कार बातमी

या प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हैदराबाद पोलिसांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.

Hyderabad encounter
राष्ट्रीय मानवाधिकार आयोग
author img

By

Published : Dec 6, 2019, 5:24 PM IST

नवी दिल्ली - पशुवैद्यकीय महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या ४ आरोपींना हैदराबाद पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये आज (शुक्रवारी) पहाटे ठार केले. या प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हैदराबाद पोलिसांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.

हेही वाचा - पोलिसांवर हल्ला केल्यानं आरोपींना गोळ्या घातल्या, हैदराबाद पोलिसांची पत्रकार परिषद

हैदराबादमध्ये शुक्रवारी सकाळी झालेला एन्काऊंटर हा चिंतेचा विषय असल्याचे आयोगाने म्हटले आहे. मानव हक्क आयोगाचे चौकशी पथक घटनास्थळी जाऊन चौकशी करणार असल्याची माहिती मिळत आहे. आयोगाच्या डायरेक्टर जनरल (तपास विभाग) यांच्या नेतृत्त्वाखाली हे पथक चौकशी करणार आहे. आयोगाचे तपास विभागाचे अधिकारी तत्काळ हैदराबादला रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच याप्रकरणी तत्काळ अहवाल सादर करण्यास पथकास सांगण्यात आले आहे.

हेही वाचा - हैदराबादमधील एन्काऊंटर वादात; अनेकांची चौकशीची मागणी

गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपींना घटनास्थळी नेले असता त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यामुळे आरोपींना स्वसंरक्षणार्थ ठार केल्याचे पोलीस आयुक्त व्ही. एस. सज्जनार यांनी सांगितले. आरोपींनी पोलिसांच्या दोन बंदुका हिसकाऊन घेतल्या होत्या. तसेच तीक्ष्ण हत्याराने ४ आरोपींनी पोलिसांवर हल्ला केला. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र, आरोपी आत्मसमर्पण करण्यास तयार नव्हते, त्यामुळे पोलिसांनी गोळीबार केला. यामध्ये चारही आरोपी ठार झाले, अशी माहिती हैदराबाद पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा - हैदराबाद एन्काऊंटर : सोशल मीडियावर व्ही. सी. सज्जनार यांचा ट्रेंड

आरोपींच्या एन्काऊंटरमुळे देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले. तर काहींनी कायदा हातात घेतल्यावरून पोलिसांच्या चौकशीची मागणी केली आहे. पीडितेला न्याय मिळाला मात्र, अशा पद्धतीनं कायद्याला डावलून पोलिसांनी कारवाई करण्याचे दूरगामी परिणाम होतील, असे काही जणांनी सोशल मीडियावरून म्हटले आहे.

Intro:Body:

#hyderabadEncounter: राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं दिले चौकशीचे आदेश

आरोपींच्या एन्काऊंटरमुळे देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले. तर काहींनी कायदा हातात घेतल्यावरुन पोलिसांच्या चौकशीची मागणी केली आहे. पीडितेला न्याय मिळाला  मात्र, अशा पद्धतीनं कायद्याला डावलून पोलिसांनी कारवाई करण्याचे  दुरगामी परिणाम होतील, असे काहीजणांनी सोशल मीडियावरून म्हटले आहे.  

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.