ETV Bharat / bharat

पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोणताही हवाई हल्ला झालेला नाही; लष्कराचे स्पष्टीकरण

भारतीय सीमारेषेजवळ कोणताही गोळीबार झालेला नाही. पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला झाल्याचे वृत्तही खोटे असल्याचे भारतीय लष्कराचे डायरेक्टर जनरल (ऑपरेशन्स) लेफ्टनंट जनरल परमजीत सिंग यांनी सांगितले.

लष्कराचे स्पष्टीकरण
लष्कराचे स्पष्टीकरण
author img

By

Published : Nov 19, 2020, 9:08 PM IST

Updated : Nov 20, 2020, 7:54 AM IST

नवी दिल्ली - भारतीय लष्कराने पाकव्यापत काश्मीरमध्ये 'पिनपॉईंट स्ट्राईक' केला. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळावर हवाई हल्ला झाला, अशी काही वेळापूर्वी वृत्तसंस्थांनी माहिती दिली होती. मात्र, त्यामध्ये तत्थ नसल्याचे आणि असा कोणताही हवाई हल्ला झाला नसल्याचे भारतीय लष्कराकडून आता स्पष्ट करण्यात आले आहे.

सीमारेषेजवळ कोणताही गोळीबार नाही

भारतीय सीमारेषेजवळ कोणताही गोळीबार झालेला नाही. पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला झाल्याचे वृत्तही खोटे असल्याचे भारतीय लष्कराचे डायरेक्टर जनरल (ऑपरेशन्स) लेफ्टनंट जनरल परमजीत सिंग यांनी सांगितले. गुरुवारी सायंकाळी पीटीआयच्या हवाल्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला झाल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले होते. या वृत्ताला काहीही अर्थ नसून ते वृत्त खोटे आहे, असेही परमजित सिंग यांनी म्हटले आहे.

पाककडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन

गेल्या काही आठवड्यांमध्ये पाकिस्तानी सेना वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. तर दुसरीकडे, दहशतवाद्यांना सीमेपलीकडून घुसखोरी करण्यासही पाकिस्तान लष्कर मदत करत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. बऱ्याच वेळा एकीकडे दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यास मदत मिळावी म्हणून दुसरीकडे पाकिस्तान लष्कर आर्टिलरी गन्सच्या सहाय्याने अंदाधुंद गोळीबार करते. यात बऱ्याच सामान्य नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. अधिकृत आकडेवारी पाहिली, तर २०१९मध्ये तब्बल १८ नागरिकांचा पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात मृत्यू झाला होता, तर यावर्षी २१ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

पाकचा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न

एकीकडे दहशतवादाला समर्थन देणारा पाकिस्तान, एफएटीएफच्या नजरेत आपली प्रतिमा चांगली राखण्यासाठी आता सीमेवरील तरुण नागरिकांना लक्ष्य करत आहे. या तरुणांच्या सहाय्याने ते भारतात शस्त्रास्त्रांची तस्करी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच, भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईमध्ये ठार झालेले दहशतवादी हे सामान्य नागरिक असल्याचे सांगत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावरुन सहानुभूती मिळवण्याचाही प्रयत्न करत आहे.

हेही वाचा : छत्तीसगड : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महिलांसाठी खास 'मोबाइल मेडिकल क्लिनिक' लाँच

Last Updated : Nov 20, 2020, 7:54 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.